Aditya Thackeray : बांद्र्याचा माणूस बांधावर जातो अन् वांद्रे कधी येतो हे कळतच नाही...

Shivsena : शिंदे गटानं पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचलं...
Naresh Mhaske, aditya thackeray
Naresh Mhaske, aditya thackeraysarkarnama

डोंबिवली : बांद्र्याचा माणूस बांधावर कधी जातो, बांधावरून बांद्र्याला कधी येतो हे कळत नाही, त्यांचे लक्झरी दौरे आहेत. जेव्हा हाती सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शेकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळाली.

फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याकरता त्यांचे हे सर्व नाटक सुरू आहे. शेतकरी बळीराजा एवढा दूधखुळा नाही. त्यांना कळतं आपल्यासाठी कोण काम करतात. सातच्या आत ते घरी येतात नंतर त्यांना खूप काम असते, अशी टीका खोचक टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. (Naresh Mhaske, aditya thackeray Latest News)

Naresh Mhaske, aditya thackeray
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातातचं कसे? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने गुरुवारी कब्जा केला. त्यानंतर सांयकाळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शाखेला भेट दिली. म्हस्के यांनी नुकतेच आदित्य यांच्यावर एक ट्विट केले आहे. याविषयी ते म्हणाले, शिंदे फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांची रोकड जमा झाली. आपण सातबारा कोरा करण्याच्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या, केला का सातबारा कोरा? असा सवालही उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, भू-विकास बँकेचे कर्ज माफ केले आणि आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये देऊ, असे सांगितले होते. दिले का बांधावर जाऊन? नुकसान भरपाईसाठी एनडीआरएफ चे काही नियम आहेत ते नियम आपण शिथिल केले आहेत. शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देऊ केली हे सगळं शिंदे फडणवीस सरकारच्या काळात झालं आहे.

आपण काय शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरता नाटक करता. हे फक्त नाटक आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका करण्याकरता हे सर्व सुरू आहे. शेतकरी बळीराजा एवढा दूधखुळा नाही, त्यांना कळतं आपल्यासाठी कोण काम करतात, अशा शब्दात मस्के यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली.

Naresh Mhaske, aditya thackeray
Bacchu Kadu आणि मुख्यमंत्र्याचा गमतीशीर संवाद, FAKE Audio Clip Viral

भारतीय चलनी नोटांवर कोणाचे फोटो असावे याविषयी सुरू असलेले राजकारणावर ते म्हणाले, हा विषय देशाच्या पॉलिसी संदर्भातला आहे नोटांचे पॉलिसी तुम्ही, मी किंवा आणखी कोण नाही ठरू शकत. देशातील वरिष्ठ नेते हा निर्णय घेतील या विषयावर आत्ताच्या परिस्थितीमध्ये देशांमध्ये, राज्यांमध्ये वाद घालणं योग्य नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com