एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा ; राऊतांचा शिंदेंना टोला, म्हणाले, बाळासाहेब हयात असते तर..

बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांवर उपकार केले. या उपकाराच्या ओझ्याखाली राहायला हवं.
Sanjay Raut News, Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
Sanjay Raut News, Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी टि्वट करीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. 'वो ही 'गुरू'...'गुरूर' भी वो ही', असं टि्वट राऊतांनी केलं आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. (Sanjay Raut news update)

संजय राऊत म्हणाले, " कोणतीही भीड न बाळगता बाळासाहेब थेट बोलायचे. त्यामुळे बंडखोरांबाबत बाळासाहेबांनी काय भाष्य केले असते, याचा आता नुसता विचार करावा लागत आहे. बाळासाहेब ठाकरे हेच लाखो शिवसैनिकांचे गुरु आणि अभिमान आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये बंडखोर आमदारांचा समाचार घेतला असता,"(Shivsena Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, "ज्यांची ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे, अशा सगळ्यांचे बाळासाहेब ठाकरे गुरु आहेत. महाराष्ट्रावर, देशावर ज्यांची निष्ठा आहे त्या सगळ्यांचे बाळासाहेब गुरु आहेत, असा गुरु होणे नाही. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो. काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन 'बाळासाहेब आमचे गुरु,' असे म्हणत आहेत. आज बाळासाहेब असते तर त्यांनी त्याच्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेणे गरजेचे आहे,"

Sanjay Raut News, Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
अपवाद वगळता बंडखोरांचा पराभवच होईल ; शरद पवारांचा हल्लाबोल

"बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश सर्वकाही आहेत. त्यांनी निष्ठेच्या बंधनाने सर्वांना बांधून ठेवले होते. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांवर उपकार केले. या उपकाराच्या ओझ्याखाली राहायला हवं," असा टोलाही राऊतांनी बंडखोरांना यावेळी लगावला.

"बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जे सोडून गेले, तेच आज बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. मात्र, एकनिष्ठा हीच खरी गुरुदक्षिणा असते," अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com