Tushar Gandhi : “मला नथुरामचा अभिमान वाटतो” असे म्हणणाऱ्या ठाकरेंच्या भेटीला तुषार गांधी..

Tushar Gandhi : तुषार गांधी आणि मेधा पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Tushar Gandhi  latest news
Tushar Gandhi latest newssarkarnama

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना शिवसेनेत मोठ्या प्रमाणात मोठ्या घटना होत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केले, त्यावेळी शिवसेनेवर टीका झाली. बुधवार ( १२ ऑक्टोबर) हा दिवस शिवसेनेसाठी राजकीय वर्तुळे पूर्ण करणारा ठरला.

शिवसेनेचे फूट पडल्यानंतर दलित चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केले. त्यानंतर काल अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी कम्युनिस्टांचा शिवसेनाला पाठिंबा दिला. ही घटना ताजी असताना काल (बुधवारी) महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी आणि मेधा पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

तुषार गांधींसह फिरोज मिठीबोरवाला हे होते. शिवसेना प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे या प्रसंगी उपस्थित होत्या.त्यामुळे शिवसेना गेल्या अडीच वर्षांपासून एकापाठोपाठ एक राजकीय वर्तुळे पूर्ण करत चाललल्याचे दिसते.

पुण्याच्या टिळक चौकात 1991 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी,“होय मला नथुरामचा अभिमान वाटतो”,असे उद्गार काढले होते. त्यांच्या या विधानावरून देशभरात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यावेळी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या भाषणाचा धागा पकडून नाशिकमध्ये नथुरामचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती.

‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या अभियानात डॉ. जी.जी. पारीख, मेधा पाटकर यांच्यासह देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे. आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आमची एकजूट दाखवण्यासाठी आलो आहोत. आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून ‘नफरत छोडो, संविधान बचाव’ अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचे आवाहनही आम्ही त्यांना केले आहे, असे तुषार गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com