विरोधकांचे तोंड गटार आहे ; त्यांच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटणार असतील तर..

"बाळासाहेबांच्या फोटोची ऍलर्जी आहे का या लोकांना, आपण सुद्धा त्यांचा फोटो सुरुवातीच्या काळात लावत होतात त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं,"
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

मुंबई : मराठवाड्यामध्ये शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबाद येथे स्थापन झाली. त्या शाखेचा वर्धापन दिन आज आहे. या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेची भव्य सभा आज होत आहे. सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. (CM Uddhav Thackeray Rally at Aurangabad)

या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं. "विरोधकांचे तोंड गटार आहे. पण, अशाप्रकारे तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही," असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिला.

राऊत म्हणाले,"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काही मोठे काम करून ठेवले आहे. त्याचा हा द्वेष आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल विरोधकांचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलावे, कसं बोलावे याच भान त्यांनी ठेवले पाहिजे,"

Sanjay Raut
Rajya sabha Election : मतदानासाठी आमदारांना या नियमाचं पालन करावं लागतं..

"राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार सत्तेत येत असताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरविण्यात आला होता. ज्यात राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या कारभार होता असल्याचे त्यांनी सांगितले," असे राऊत म्हणाले.

"आजच्या सभेची मोठ्या जोशात तयारी सुरु आहे. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आजच्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता आहे. बऱ्याच काळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर सभा घेत आहे. या सभेला मराठवाड्यातील लाखो शिवसैनिक येतील," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

आजच्या सभेत ठाकरी तोफ कोणावर धडाडणार. या तोफेच्या निशाण्यावर कोण असणार? सभेतून शिवसैनिकांना कोणता संदेश दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

बाळासाहेबांच्या फोटोची ऍलर्जी आहे का?

आजचही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फलकावर लावत असते, अशी टीका मनसेने नुकतीच शिवसेनेवर केली होती, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, "बाळासाहेबांच्या फोटोची ऍलर्जी आहे का या लोकांना, आपण सुद्धा त्यांचा फोटो सुरुवातीच्या काळात लावत होतात त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com