बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार कोण? नांदगावकर यांनी क्षणात उत्तर दिले...

राज ठाकरे ( Raj Thackeray ) हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचा सूर मनसे नेत्यांनी लावला आहे.
Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates
Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News UpdatesSarkarnama

मुंबई - शिवसेनेच्या इतिहासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतरचा सर्वांत मोठा धक्का हा सध्या बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे आतापर्यंतचा शिवसेनेतील सर्वात मोठे बंड मानले जात आहे. शिंदे हे आपल्यासोबत तब्बल 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. मात्र त्यानंतर शिंदे गट विरुध्द उरलेली शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून राज ठाकरे ( Raj Thackeray ) हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचा सूर मनसे नेत्यांनी लावला आहे. ( Bala Nandgaonkar met Fadnavis: He said, Raj Thackeray is Balasaheb's heir... )

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचे सांगितले. "मी वर्षानुवर्षे हेच सांगत आलो आहे आणि यापुढेही बोलत राहणार. कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या अंगा खांद्यावर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाळासाहेबांची पूर्ण भावना आणि भूमिका माहिती आहे. बाळासाहेब हे काही व्यक्ती नव्हते तर ते एक विचार होते. त्यांचे संस्कार आमच्यावरही झाले आहेत. बाळासाहेब हे सर्वांना घेऊन जाणारे मार्गदर्शक नेतृत्व होते," असे त्यांनी सांगितले.

Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण असा वाद पूर्वीपासूनच चालत आला आहे. अनेक वेळा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना केली जात असते. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांच्याकडे भाषण कौशल्य आणि आक्रमकपणा पाहायला मिळतो. बाळासाहेब विरोधकांना ज्याप्रमाणे सडेतोड उत्तर द्यायचे तीच शैली राज ठाकरे त्यांच्या सभांमध्ये वापरताना दिसतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates
बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे, तुम्ही त्यांच्या पोटी आलात म्हणजे राजा झालात का ?

व्यासपीठावरून विरोधकांचा समाचार घेताना दोघांमध्येही सारखाच आक्रमकपणा पाहायला मिळतो. त्यामुळे नेमके शिवसेनेचे राजकीय वारसदार कोण असा सामान्य जनतेला प्रश्न पडला होता. मी शिवसेना बाळासाहेबांच्या आजूबाजूंच्या लोकांमुळे सोडली असे आजही जाहीरपणे राज ठाकरे सांगतात. शिवसेनेत झालेल्या शिंदे यांच्या बंडामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राज की उद्धव असाच पेच पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in