BYJU’Sचा किंग खानला दणका ; जाहिरातीवर बंदी, हे संस्कार आमच्या मुलांवर नकोत

लर्निंग अॅप बायजू (BYJU’S) ने शाहरुख (shahrukh khan) सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे.

BYJU’Sचा किंग खानला दणका ; जाहिरातीवर बंदी, हे संस्कार आमच्या मुलांवर नकोत
shahrukh khansarkarnama

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याच्यावर एनसीबीने कारवाई करुन त्याला अटक केली आहे. आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यावर अनेक मिम्स व्हायरल झाले होते. त्याचा परिणाम 'किंग खान" शाहरुख खान याच्या जाहीरातीवर झाला आहे. लर्निंग अॅप बायजू (BYJU’S) ने शाहरुख (shahrukh khan) सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे.

खानच्या स्पॉन्सरशिप डिल्समध्ये बायजूस हा सर्वाधिक मोठा ब्रँन्ड होता. या व्यतिरिक्त त्याच्याकडे ह्युंदाई, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिज्म सारख्या कंपन्यांच्या सुद्धा जाहिराती आहेत.

शाहरुखच्या प्रायोजकत्वाच्या व्यवहारांमध्ये बायजू हा सर्वात मोठा ब्रँड होता. शाहरुखला या ब्रँडला मान्यता देण्यासाठी वर्षाला 3 ते 4 कोटी मिळत असत. 2017 पासून तो कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याशिवाय, त्याला आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझम, ह्युंदाई अशा सुमारे 40 कंपन्यांशी एंडोर्समेंट आहे.

shahrukh khan
नवाब मलिकांच्या आरोपांना NCBचे प्रत्युत्तर

आर्यनला अटक झाल्यानंतर समाजमाध्यमांवर शाहरुख खानला ट्रोलिंग केले जात आहेत. ज्या ब्रॅण्डच्या जाहीरात शाहरुख आहे. त्या ब्रँण्डलाही नेटकरींनी ट्रोल केलं आहे.समाजमाध्यमांवर नेटकरी बायजूसा विविध प्रश्न विचारत आहेत. शाहरुखला ब्रँड अॅम्बेसेडर बनवून कंपनी काय संदेश देत आहे? अभिनेते हे सर्व त्यांच्या मुलाला शिकवतात का? असा प्रश्न विचारला जात आहे.

बायजूस शाहरुख खानला 3 – 4 कोटी रुपये सुद्धा देत होती. अंमली पदार्थ प्रकरणी कोटार्ने आर्यन खान याचा जामिन फेटाळल्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.