मिंधे आणि कमळाबाईच्या अभद्र हातमिळवणीने महाराष्ट्राला ‘लुच्चे दिन’ ; ठाकरेंनी तोफ डागली

Uddhav Thackeray| Shinde-Fadanvis Politics| केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या तालावर सगळा कारभार सुरू आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Shivsena Thackeray Group मुंबई : मिंधे आणि कमळाबाईच्या अभद्र हातमिळवणीनंतर गुजरातला ‘अच्छे दिन’ तर महाराष्ट्राच्या वाट्याला ‘लुच्चे दिन’ आल्याची टीका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात होणारे 1 लाख 80 हजार कोटींचे चार मोठे प्रकल्प परराज्यात गेले. यातले तीन प्रकल्प गुजरातने पळवले. चार प्रकल्प एकापाठोपाठ हातून निसटल्याने राज्यातील तरुणांची दीड लाख नोकरीच्या संधीही हिरावल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

यावेळी ठाकरे गटाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ''महाराष्ट्रात खोके सरकार सत्तारूढ झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या तालावर सगळा कारभार सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी या प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातला खूश करण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्रात येणारे मोठमोठ्या प्रकल्पांची पळवापळवी सुरू आहे. पण 'मिंधे' सरकारने याबाबत काहीच हालचाल न केल्या आतापर्यंत चार प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटले.

Uddhav Thackeray
शिंदे-फडणवीसांनी नार्वेकरांची सुरक्षा वाढवली ; ठाकरे कुटुंबियांसह शरद पवार, आव्हाडांची सुरक्षा कायम

महाराष्ट्रात येणारे 'हे' चार प्रकल्प परराज्यात...

- टाटा एअरबस

टाटा एअरबस हा 22 हजार कोटींचा विमान निर्मिती कारखाना महाराष्ट्रात येणार होता. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हा प्रकल्प नागपूरमधील मिहान येथे उभारण्यात येणार असल्याचे दावे केले होते. या प्रकल्पातून 6 हजार नोकऱ्याही मिळाल्या असत्या. पण अचानक टाटा एअरबस’ हा प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

-वेदांता फॉक्सकॉन

गेल्या महिन्यातच 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प हिसकावून घेण्यात आला. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टर निर्मिती प्रकल्प पुण्याजवळील तळेगाव येथे उभारला जाणार होता. पण अचानक कंपनीने गुजरातमधील ढोलेरा या ठिकाणी प्रकल्प उभारणी संदर्भात गुजरात राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. या प्रकल्पातून अंदाजे एक लाख नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकली असती.

-बल्क ड्रग पार्क

औषध निर्मिती क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश असलेला बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती होती. जवळपास तीन हजार कोटींच्या या प्रकल्पातून 50 हजार लोकांना रोजगार मिळाले असते. विशेष म्हणजे या प्रकल्पांसाठी रोहा आणि मुरुड येथे पाच हजार एकर जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केली होती. पण हा प्रकल्पदेखील 1 सप्टेंबरला केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये हलवला.

-वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रकल्प

वरील प्रकल्पांसोबतच गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आलेला 424 कोटींचा वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रकल्पालाही नकार दिला. 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. या प्रकल्पात तीन हजार जणांना नोकऱया मिळाल्या असत्या. औरंगाबादमधील ऑरीक सिटीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र तोही तामीळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलवण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com