
Bacchu Kadu News : : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात 'खोक्यां'वरून वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतरही दोघांमध्ये धुसफूस सुरुच होती. मात्र, आता बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी देत ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या संदर्भात बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी त्यांनी सहकाऱ्याबरोबर सुरु असलेली कुजबूज कॅमेरात कैद झाली. रवी राणांच्या वक्तव्यांमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) हात असल्याचा आरोप कडू यांनी केला.
पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी बच्चू कडू एका व्यक्तीशी बोलत होते. त्यांचा संवाद कॅमेरात कैद झाला. त्यामध्ये 'काय ऐकतोय काय झाले अजून?,' असे बच्चू कडूंना एक व्यक्ती विचारत आहे. त्यावर बच्चू कडू म्हणतात, ते गोंधळलेले आहेत. 3 तारखेला तीन वाजता वाद मिटला सांगितले त्यानंतर सहा वाजता घरात घुसून मारू आणि आज म्हणतये वाद नाही राहिला. डोक्यावर परिणाम झाला वाटते. ते म्हणतये देवेंद्रजी सांगत आहे, तेच बोलतो, असे कडू म्हणाले.
यानंतर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने त्यांना माईक सुरु असल्याचे सांगितले. दोघेजण एक सावध झाले त्यामुळे चर्चा थांबली. 'एबीपी माझा'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वाद आणखी वाढवायच नाही, असे कडू यांनी सांगितले. ''रवी राणा आणि नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले. मात्र, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मग आम्ही म्हणायचे का की त्यांनी पैसे घेतले, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. हा वाद आणखी वाढवायची नाही. माध्यमे वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला. राणांना भेटणार, त्यावेळी माध्यमांनाही बोलावणार आहे, असेही कडू यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.