बच्चू कडूंच्या माध्यमातून बसणारा पहिला हादरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी थोपवला...

बच्चू कडू यांनी किमान ३ आमदारांची मोट बांधून आघाडीचा पाठिंबा काढण्याची तयारी दाखवली होती.
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi RanaSarkarnama

मुंबई : प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी किमान ३ आमदारांची मोट बांधून आघाडीचा पाठिंबा काढण्याची तयारी दाखवली होती. मात्र असे करून तुमचा फायदा काय होईल,आमच्या सरकारच्या स्थैर्यावर त्याचा कोणताही परिणाम प्रयत्न होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात आणून देत हे बंड शमवले आहे.

दराम्यान,भाजपच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या राणा दाम्पत्याला फडणवीसांनी आधीच शांत केले होते. मात्र आक्रमक झालेल्या आमदार कडूना शांत करण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यश आले असल्याने शिंदे-फडणवीस सरकारला बसणारा संभाव्य हादरा या निमित्ताने टळाला, असेच म्हणावे लागेल. (Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana Latest News)

Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana
अब्दुल सत्तार आठ दिवसांत आमदारकीचा राजीनामा देणार; पण....

बच्चू कडू माझ्या शब्दाखातर गुवाहाटीला गेल्याचे सांगत फडणवीसांनीही त्यांना आपला मानले आहे. भविष्यात विस्तार होईल तेंव्हा बच्चू कडूंचा समावेश केला जाईल, असे आश्वासन दोन्ही नेत्यांनी त्यांना दिले आहे. उध्दव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू यांना पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने ते नाराज झाले आहेत. विदर्भातले हे नेते आपल्या समवेत असावेत असे दोन्ही नेत्यांना वाटत तर होते. मात्र त्यांना सत्य समजावून सांगण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार पाडल्याचे सांगण्यात येते.

Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana
सरोदेंची हस्तक्षेप याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली; शिंदेंचे टेन्शन वाढणार?

जनतेच्या प्रश्नांशी नाते सांगणारे बच्चू कडू कधी कधी संतापतात. त्यांना अन्यायाची चीड आहे. त्यापोटी त्यांनी केलेली काही कृत्येही चर्चेत आहेत. मात्र त्यांना कामाची तळमळ आहे, हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना वळवले, अशी माहिती शिंदे गटातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने दिली. मंत्रालयात काम होत नसल्याने कडू यांनी एकदा कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. गेले काही दिवस ते कमालीचे अस्वस्थ होते. मात्र वेगळा विचार करुन काहीही मिळणार नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com