Bachhu Kadu : बच्चू कडूंची चक्क संजय राऊतांना टाळी ! भाजपवरील 'त्या' आरोपावर झालं एकमत, म्हणाले...

Bachhu Kadu : ''कितीही शक्ती एकत्र आल्यातरी जनशक्तीचं काय?''
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Bachhu kadu News : राज्यपालांसह भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानांवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांच्याकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील भाजपवर निशाणा साधताना छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय असं वक्तव्य केले होते. आता त्या आरोपाशी माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी देखील सहमती दर्शविली आहे.

Bacchu Kadu
Navneet Rana : नवनीत राणा - रवी राणांविरोधात न्यायालयाचे वॉरंट जाहीर!

बच्चू कडू यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले, भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय, असं संजय राऊत जे काही म्हणाले ते काही अंशी खरंच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक आक्षेपार्ह बोलतात. कोणत्याही महापुरुषांबद्दल बोलणं उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो.

तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhgat singh Koshyari) यांनी कोणत्याही महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य उचित नाही. याचा आम्ही निषेध करतो. मात्र, प्रत्येक गोष्टीला कारवाईची गरज नसते. ज्याला त्याला ते समजायला पाहिजे. जनाची नाही तर मनाची असली पाहिजे. राज्यपाल यांच्यावर कारवाई होऊ नये असे मला वाटत नाही. त्यांनी जे बोलले असतील त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही कडू यावेळी म्हणाले.

Bacchu Kadu
Satara : घरच्या कार्यक्रमाला निमंत्रण कशाला लागते... शिवेंद्रसिंहराजेंची खोचक टीका

...तर आनंद द्विगुणित होईल !

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा. पण दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रिपद मिळाले तर आनंद द्विगुणित होईल असेही बच्चू कडू यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

''कितीही शक्ती एकत्र आल्यातरी जनशक्तीचं काय?''

उद्धव ठाकरे तिन्ही शक्ती तिन्ही शक्ती जरी एकत्र आल्या तरी जनशक्तीचं काय? दिव्यंगासाठी प्रश्न मांडण्यासाठी आम्ही १० वेळा गेलो. त्यावर साधी एक बैठक नाही झाली. जनतेबद्दल आस्था नसेल तर अशा शक्त्या एकत्र होऊन काही उपयोग नाही अशा शब्दांत कडू यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com