Bachchu Kadu on Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंचं सूचक विधान, म्हणाले, ''यंदाच्या वर्षी...''

Bachchu Kadu News: सरकारला पाठिंबा दिला म्हणजे...
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Bachchu Kadu on Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारला सत्तेत येऊन सहा महिने उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्यानं शिंदे गटातील आमदारांमधील धूसफूस चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून जाहीर नाराजी बोलून दाखवली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारीख पे तारीख देत असल्यानं मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. यातच आता शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी सूचक विधान केलं आहे.

माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले, ''मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसत असतो. तेव्हा मी त्यांना २०२४ नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगत असतो.

Bacchu Kadu
Rahul Gandhi: ''आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि...''; राहुल गांधींनी पु्न्हा भाजप,संघाला डिवचलं

एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवूच की, पण आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. आणि मंत्रिमंडळ विस्तार लांबत असला तरी कामं होताहेत ना, ती थांबलेली नाही असं सांगतानाच दिव्यांग मंत्रालय त्याचाच भाग आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात होईल तेव्हा होईल. तुम्ही काहीतरी काम करा.असा सल्लाही बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

Bacchu Kadu
Bjp News : भाजप खासदारानं उडविला स्वपक्षीय आमदाराच्याच पॅनलचा धुव्वा

बच्चू कडूंनी पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक आम्‍ही भाजपा- शिंदे गटासोबत लढणार होतो, पण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रहार आणि महाराष्‍ट्र इंगजी शाळा संस्‍थाचालक (मेस्टा) संघटनेकडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेतली. आमचे २ लाख मतदार आहेत. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील. नंतर काय होते ते पुढचे पुढे पाहून घेऊ असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

सरकारला पाठिंबा दिला म्हणजे...

सरकारला पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवावी, असं परिपत्रक काढलं नव्हतं. याबाबत आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनीच यावर तोडगा काढावा. आम्हाला मराठवाड्यातील किमान एकतरी जागा मिळाली पाहिजे अशी मागणीही कडू यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in