Rajya Sabha Election : बच्चू कडू अन् राजकुमार पटेलांचं आधीच ठरलंय!

महाविकास आघाडीच्या बैठकीला दोघेही अनुपस्थित होते.
Rajya Sabha Election : बच्चू कडू अन् राजकुमार पटेलांचं आधीच ठरलंय!
MLA Rajkumar Patel, Minister Bacchu Kadu Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. पण या बैठकीला ठाकरे सरकारमधील मंत्री बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हजर नव्हते. त्यामुळं या दोघांचं मत कुणाला, या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर बुधवारी या दोघांनीही याबाबत स्पष्टचं सांगितलं आहे. (Bacchu Kadu Latest Marathi News)

हरभरा व धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीआधी त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. आघाडीच्या बैठकीला गैरहजर राहू त्यांनी शिवसेनेचं टेन्शन वाढवलं होतं. पण बुधवारी त्यांनी आपण महाविकास आघाडीसोबतच असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Bacchu Kadu and Rajkumar Patel with Mahavikas Aghadi)

MLA Rajkumar Patel, Minister Bacchu Kadu Latest Marathi News
अवघा महाराष्ट्र सोडवत असलेलं शब्दकोडं! मनसेनं फडणवीसांच्या स्टाईलनं अशी उडवली खिल्ली

कडू म्हणाले, मी महाविकास आघाडीसोबतच आहे. पण निवडणुकीचे मतदान आम्ही पाच मिनिटेआधी करणार आहोत. मी आधी शेतकरी आहे मग मंत्री आहे. धान व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. आघाडी सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना मदत मिळावी, ही अपेक्षा आहे. त्यासाठी सरकारला इशारा दिला आहे. राज्यसभेचं मतदान गोपनीय आहे, पण मी आघाडीसोबतच असल्याचे कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बच्चू कडू हे आघाडीचे मंत्री असल्याने विरोधात जाणार नाहीत. त्यांची फक्त हरभरा आणि धान उत्पादकांना मदतीची अपेक्षा आहे. मतदान पाच मिनिटे आधी केलं किंवा सकाळी नऊ वाजता केलं तरी काही हरकत नाही. ते आघाडीच्याविरोधात जाणार नाहीत. आघाडीत कुणीही नाराज नाही. सर्व उमेदवार निवडून येतील. एखादं काम झालं नाही तर ते बोलणारच आहेत. पण विरोधात जाणार नाहीत, असं सांगत त्यांनी आपणही आघाडीसोबत असल्याचे सांगितले.

MLA Rajkumar Patel, Minister Bacchu Kadu Latest Marathi News
महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची! वसंत मोरेंनी घातली साद

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने घेतलेल्या बैठकीला एकूण 29 आमदारांपैकी 13 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावली. त्यामध्ये सरकार स्थापनेवेळी भाजपच्या गोटात असलेल्या दोन आमदारांचा समावेशही आहे. सरकार स्थापनेवेळी आघाडीकडे 170 आमदारांचं संख्याबळ होतं. तर भाजपकडे आठ आमदारांसह 114 आमदार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in