मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत पुरंदरेंचे कलादालन उभारा!

संयुक्त महाराष्ट्र कलादालनात (samyukta maharashtra smriti kaladalan) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे कलादालन उभारण्याची मागणी भाजपनं केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत पुरंदरेंचे कलादालन उभारा!
Babasaheb Purandaresarkarnama

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनात (samyukta maharashtra smriti kaladalan) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे कलादालन उभारण्याची मागणी भाजपनं केली आहे. महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना याबाबतचे पत्र दिले आहे.

''हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी केली, त्या कलादालनात पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील असे आम्हाला वाटते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र कालादालनाच्या पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभारण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला जावा,'' अशी विनंती भाजपचे नगरसेवक, गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्राव्दारे केली आहे.

''या कलादालनातील पहिल्या मजल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या गड किल्ल्यांच्या विहंगम छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत बाबासाहेब यांचे कलादालन उभारावे. इथे शिवशाहीर बाबासाहेबांनी निर्माण केलेले शिवचरित्र, त्यावर आधारित साहित्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र आदींचे प्रदर्शीत करण्यात यावे. हीच शिवशाहीर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल,'' असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

महापैार पेडणेकर यांना पाठविलेल्या पत्रात शिंदे म्हणतात..

कलादालनाच्या तळ घरात संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक आहेत. तर तळ मजल्यावर या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे आहेत. तसेच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं, प्राचिन संस्कृतीचं, भौगोलिक समृद्धतेचं दर्शन घडवण्यावसाठी विविध कलात्मक बाबी येथे आहे.

Babasaheb Purandare
माझ्यावर RSSचे संस्कार, मी विक्रम गोखलेंवर बोलणार नाही!

परंतु संयुक्त महाराष्ट्र कलादालन उभारल्यानंतरही याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला नाही. आणि त्यापेक्षाही दुर्दैवी बाब म्हणजे मुंबई महापलिकेने पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. कोट्यवधी रूपये खर्चून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेने व दृष्टीने कलादालनाची निर्मिती केली होती, ते कलादालनच आज महापालिकेच्या इच्छेअभावी दुर्लक्षित आहे. बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा एकप्रकारे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अपमानच केला आहे.

परंतु अजूनही संधी गेलेली नाही. स्व. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या ऋषीतुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वंदनीय मानत होते. त्याच शिवशाहीरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादालन बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे.

यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांचा इथे ओघ वाढणारच. असे झाल्यास हा स्व.बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा मान असेल तर स्व.शिवशाहीर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान असेल.

या कलादालनातील पहिल्या मजल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या गड किल्ल्यांच्या विहंगम छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत बाबासाहेब यांचे कलादालन उभारावे. इथे शिवशाहीर बाबासाहेबांनी निर्माण केलेले शिवचरित्र, त्यावर आधारित साहित्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र आदींचे प्रदर्शीत करण्यात यावे. हीच शिवशाहीर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

येथील गड किल्ल्यांची छायाचित्रे आणि बाबासाहेबांनी सांगितलेली गडकिल्ल्यांची महती यांचा सुरेख मिलाप या कलादालनात पाहायला मिळेल. तसेच शिवशाहीर बाबासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आशीर्वाद लाभला होता, त्यामुळे सावरकर स्मारक शेजारी ही वास्तू असल्याने त्यांच्या नावाने कलादालन उभारण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरी जागा योग्य असू शकत नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in