Jitendra Awhad Latest Marathi News
Jitendra Awhad Latest Marathi NewsSarkarnama

वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी..वादग्रस्त पोस्टवरून आव्हाड संतापले...

पवारांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि विरोधी पक्ष भाजपच्या (BJP) नेत्यामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगतांना दिसत आहे. नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सादर केलेल्या एका कवितेवरून सध्या राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. (Jitendra Awhad Latest Marathi News)

Jitendra Awhad Latest Marathi News
‘फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे’

पवारांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून हा व्हिडिओ अर्धवट दाखवून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत ट्वीट करत अप्रत्यक्षपणे पवारांवर टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून या तरूणावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Jitendra Awhad Latest Marathi News
हिंदुत्वापाठोपाठ हिंदूजननायकसाठी चढाओढ! शिवसेना नेत्यांकडून उद्धव ठाकरेंनाही उपाधी

आव्हाडांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या तरुणाची वादग्रस्त पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांकडे या तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की, 'काय पातळीवर हे सगळे होत आहे? या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा,' असे आव्हाडांनी म्हटलं आहे.

ही वादग्रस्त पोस्ट 'बागलाणकर' नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिण्यात आली असून पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी.. बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची...' असं यामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पवारांचा व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असे भाजपच्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवर म्हटले आहे.

यावर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं असून 'झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती,' असा पलटवार राष्ट्रवादीने भाजपवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com