नाराजी टाळण्यासाठी पहिल्या टप्यात १० मंत्र्यांना शपथ ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री शिंदे हे नगरविकास आणि गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत, गृहमंत्रीपद फडणवीस यांना हवे असल्याचे समजते.
Eknath Shinde news update
Eknath Shinde news updatesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ३० जून रोजी झाला, तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. मंत्रीपदावरुन शिंदे गट-भाजप यांच्यात होत नसलेली एकवाक्यता यामुळे राज्याचा मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. (Eknath Shinde news update)

शिंदे गटात सात माजी मंत्री आहेत. त्यांची वर्णी मंत्रीमंडळात लागेल, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde) अधिकच्या मंत्रीपदाची मागणी, बंडखोर आमदारांच्या नाराजीची शक्यता असल्याने मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केल्यास मंत्रिपद न मिळालेल्यांच्या नाराजीचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची भीती आहे.

"राष्ट्रपती पदाचे मतदान पार पडू द्या. आमदार मुंबईत असतील तेव्हा विस्तार करा.पहिल्या टप्प्यात दोन्ही गटांचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेतील’, असे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश असल्याचे समजते.

Eknath Shinde news update
कोकणातही शिवसेनेला खिंडार पडणार ? वीस नगरसेवक उदय सामंतांच्या संपर्कात

लवकरच होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी 19 ते 21 जुलैदरम्यान केवळ 10 मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यात शिंदे गटातील पाच,भाजपमधील पाच मंत्री शपथ घेणार आहेत. पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्याने आधी 10 मंत्र्यांना शपथ देण्यात येत असल्याचे समजते. अधिवेशनानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नगरविकास आणि गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, गृहमंत्रिपद फडणवीस यांना हवे असल्याचे समजते.

  • शिंदे गटात ७ माजी मंत्री आहेत. त्यांची वर्णी लागेल.

  • शंभूराज देसाई व अब्दुल सत्तार यांची कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

  • कोकणात उदय सामंत आणि दीपक केसरकर यांपैकी एकाला मंत्रिपद मिळणार

  • मराठवाड्यातून संजय शिरसाट, तानाजी सावंत, संजय रायमूलकर आणि प्रदीप जैस्वाल मंत्रिपदाचे दावेदार

  • उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटीलपैकी एकाला मंत्रिपद मिळणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com