लाख कुळे आली तरी...; पवारांना आव्हान देणाऱ्या बावनकुळेंना आव्हाडांचे सणसणीत प्रत्युत्तर

BJP-NCP Politics| राष्ट्रवादीचे बारामतीतूनच विसर्जन केले,तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल म्हटले होते.
Chandrashekhar Bavankule| JItendra Avhad|
Chandrashekhar Bavankule| JItendra Avhad|

बारामती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) बारामतीतूनच (Baramati) विसर्जन केले, तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा कानमंत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (ता. ६ सप्टेंबर) बारामतीत कार्यकर्त्यांना दिला.

बावनकुळे यामच्या बारामती दौऱ्यावर आता चहुबाजूंनी टीका सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून बावनकुळे यांनी पवारांना दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bavankule| JItendra Avhad|
Thackeray vs Shinde : महाराष्ट्र सत्‍तासंघर्ष ; आज सुनावणीची शक्यता, काय होणार ?

जितेंद्र् आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणातात की, ''1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…

बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ? बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com