Eknath Shinde यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना धरले वेठीस

Eknath Shinde : शासकीय सुट्टी नसताना कामकाज सोडून सभेला येण्याची नोटीस अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना देण्यात आली आहे.
 CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राज्यात दौरे सुरु केले आहेत. सोमवारी (ता.१२) औरंगाबाद व पैठण येथे मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे. यासाठी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार तयारी केली आहे.

माजी पर्यटनमंत्री, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची नुकतीच पैठण मतदारसंघात सभा झाली आहे. या सभेला मोठी गर्दी झाली होती, अशी मोठी गर्दी जमविण्याचे आवाहन भुमरे यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांनी कंबर कसली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदनीसांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. शासकीय सुट्टी नसताना कामकाज सोडून सभेला येण्याची नोटीस अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सरकारने अजब आदेश काढला आहे, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला हजर रहा," असा आदेश काढण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४२ गावातील अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीसांना हा आदेश देण्यात आला आहे. "१२ तारखेच्या पैठण येथील सभेला सकाळी १० वाजता हजर रहा,'असे या आदेशात म्हटलं आहे.

 CM Eknath Shinde
Thackeray vs. Shinde : ठाकरे - शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

यावरुन शिवसेनेचे नेते, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरेंवर जोरदार टीका केली आहे. गेल्यावेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ आता येऊ नये, म्हणून अंगणवाडी सेविकांना सरकारने वेठीस धरले आहे. सरकारने अगोदर त्यांचे मानधन वाढवावे, असे दानवे म्हणाले.

२० जानेवारी १९९४ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पैठणला विक्रमी सभा झाली होती. तशी गर्दी १२ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला जमवण्याचे टार्गेट रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी स्वीकारले आहे. कावसानकर स्टेडियममध्ये होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री दोन हजार कोटी रुपयांच्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे त्यांचा जंगी सत्कार होणार आहे, अशी माहिती भुमरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

बिडकीनमध्ये आदित्य ठाकरे यांनी २३ जुलैला सभा घेतली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्याच सभेला शिंदे प्रत्युत्तर देणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधी कामच केले नाही. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचा प्रश्नच आला नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in