Atul Sawe : सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडण्याचा भाजपचा डाव

Atul Sawe : २५ किलोमीटरचे हवाई अंतर कमी करणार असल्याचे सावे यांनी सांगितले. ही हवाई अंतराची मर्यादा १५ किलोमीटरपर्यंत कमी करणार असे ते म्हणाले.
Atul Sawe
Atul Sawe sarkarnama

Atul Sawe : देशातील साखर कारखान्यांनी गाळप क्षमतेचा (Crushing Capacity) विस्तार करण्यात येणार आहे. इथेनॉलमुळे उसाला मागणी (Sugarcane Demand Due To Ethanol) वाढलेली आहे. त्यामुळे आता दोन साखर कारखान्यांमधील (Distance Between Two Sugar Factory) अंतर किती असावे, यावरुन राजकारण तापलं आहे. भाजपचे नेते, सहकारमंत्री अतुल सावे यांनी याबाबत महत्वपू्र्ण विधान केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आघाडी सरकारमधील नेत्यांची साखर कारखानदारीतील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भाजपचा हा कुटील डाव असल्याचे बोलले जाते. अतुल सावे म्हणाले, "मागच्या वर्षी राज्यात सगळीकडे ऊस शिल्लक राहिला होता. ऊस गाळप होऊ शकला नव्हता, म्हणून अनेक कारखाने सुरू होत नव्हते.

नवीन साखर कारखाने आले तर उसाचा गाळप होईल. ऊस शिल्लक राहणार नाही. आम्ही ज्यावेळी दोन साखर कारखान्यातील अंतर कमी करू तेव्हा कुठच्या पक्षाचा विषय असणार नाही," "25 चे 15 किलोमीटर अंतरामुळे शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात जाईल," असे सावे यांनी सांगितले.

दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरचे हवाई अंतर कमी करणार असल्याचे सावे यांनी सांगितले. ही हवाई अंतराची मर्यादा १५ किलोमीटरपर्यंत कमी करणार असे ते म्हणाले. यामुळे आता नवीन कारखान्यांना परवानगी देण्याचा घाट भाजपा घालणार का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Atul Sawe
Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले ; सोलापूर आणि अक्कलकोटवर केला दावा

आणखी 86 साखर कारखान्यांचे प्रस्ताव

देशभरात 139 नवीन साखर कारखाने स्थापण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाले आहे, यातील सर्वाधिक 86 कारखान्यांचे प्रस्ताव महाराष्ट्रातून आले आहेत. महाराष्ट्रातून 86 पैकी तब्बल 82 कारखाने खासगी क्षेत्रातील आहे. केवळ 4 कारखान्यांचे प्रस्ताव सहकार क्षेत्रातील आहेत. देशभरात सध्या 688 साखर कारखाने असून यातील 41 सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. 337 कारखाने खासगी तर 310 कारखाने सहकार क्षेत्रामार्फत चालविण्यात येतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com