'गरज सरो वैद्य मरो हीच फडणवीस निती!'

काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते अतुल लोंढे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
Atul Londhe, Devendra Fadnavis
Atul Londhe, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या (RajyaSabha) उमेदवारीवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप राजकारण रंगले आहे. शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी हवी असले तर पक्षात या असे सांगिलते आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. या टीकेला काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Atul Londhe, Devendra Fadnavis
संभाजीराजे : चारही घरचा पाहुणा उपाशी!

या संदर्भात लोंढे यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये लोंढे म्हणाले, ''भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक, विश्वासघात केला म्हणूनच संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपची साथ सोडली.. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमाणेच भाजपने राज ठाकरे यांचाही वापर करून घेतला आणि आता सोडून दिले. 'गरज सरो वैद्य मरो' हीच फडणवीस निती आहे.'' असा हल्लाबोल लोंढे यांनी केला आहे.

संभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावरुन लोंढे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Atul Londhe, Devendra Fadnavis
पंधरा दिवसातल्या घडामोडी नीट समजून घ्या; राऊतांनी संभाजीराजेंच्या समर्थकांचे आरोप फेटाळले

दरम्यान, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारीस नकार दिल्यानंतर शिवसेनेने आपले पत्ते ओपन करत कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay Pawar) यांना राज्यसभेची (Rajya sabha) उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार भाजपच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार सहज जिंकू शकतात. पण सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच शिवसेनेने दिलेला प्रस्ताव संभाजीराजे यांनी धुडकावल्याने शिवसेनेने सहावी जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in