भातखळकरांनी अमरिंदरसिंगांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मोदींना ठरवलं बाजीगर!

पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
भातखळकरांनी अमरिंदरसिंगांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मोदींना ठरवलं बाजीगर!
AmarinderSingh, Narendra Modi, Atul BhatkhalkarSarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली. या घोषणेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं. भाजप सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपचेच आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मोदींनी बाजीगर ठरवलं आहे. पण त्यासाठी त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder sing) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाशी आगामी निवडणुकांचा संदर्भ जोडला जात आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका आगामी निवडणूक बसू शकतो, अशी भीती भाजपला असल्याचे राजकीय विश्लेषकांचं मतं आहे. प्रामुख्याने पंजाब व उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक फटका बसण्याचा धोका आहे. पंजाबमध्ये भाजपची ताकद नगण्य असली तरी अमरिंदरसिंग यांच्या रुपाने एक मोठा नेता त्यांना गवसणार आहे. पण त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याची अट घातली होती. आता मोदींनी केलेल्या घोषणेमुळे अमरिंदरसिंग भाजपशी युती करणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

AmarinderSingh, Narendra Modi, Atul Bhatkhalkar
कृषी कायद्यांचे प्राणपणाने समर्थन करणारे फडणवीस अन् बोंडे शांतच!

भातखळकर यांनी याच पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांचे ट्विट रिट्विट केले आहे. अमरिंदरसिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदींचे आभार मानले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढे काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. याच ट्विटचा संदर्भ देत भातखळकर यांनी मोदींनी बाजीगर म्हटले आहे. 'जो हार कर भी जीतते है, वो बाजीगर कहलाते है...' असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वास्तविक, भातखळकर यांना भाजपच्या इतर नेत्यांनी केलेले ट्विट रिट्विट करता येऊ शकले असते. पण त्यांनी जाणीवपूर्वक अमरिंदरसिंग यांचा आधार घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, कृषी कायद्यांचे प्राणपणाने समर्थन करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे शांतच आहेत. विरोधकांनी नेमकं त्यावरच बोट ठेवलं आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केल्यानंतर भाजपच्या राज्यभरातील नेत्यांनी त्याचे जोरदार समर्थन केले होते. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर भाजपने राज्यभरात समर्थनार्थ रॅली काढल्या. ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेतले. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे आघाडीवर होते.

भाजपच्या बहुतेक नेत्यांकडून ट्विटरवरून कायद्यांच्या समर्थनार्थ व शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्विटचा भडिमार सुरू होता. पण आज पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर फडणवीसांसह बोंडे यांचे दुपारी चार वाजेपर्यंत त्यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. फडणवीस यांनी केवळ यांचे ट्विट रिट्विट केले आहे. तर बोंडे यांचा ट्विटरवर चकार शब्दही नाही. चंद्रकांत पाटील यांनीही दुपारपर्यंत केवळ शहा आणि नड्डांचे ट्विट रिट्विट केले होते. दुपारी साडे तीन वाजता त्यांची वैयक्तिक भूमिका ट्विटवर पडली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in