`नितीन राऊत यांनी नौटंकी बंद करावी... `

कोल इंडियाने राज्य सरकारला पत्र लिहून कोळसा आधीच खरेदी करून राज्याकडे असलेल्या बंदिस्त खाणींमध्ये त्याचा साठवण्यास सांगितले होते
`नितीन राऊत यांनी नौटंकी बंद करावी... `
NItin Raut Sarkarnama

मुंबई : महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये (Thermal power project) निर्माण झालेल्या कोळसा (Coal) टंचाईमुळे राज्यावर वीजनिर्मितीचे संकट निर्माण झाले आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून कमी वीजनिर्मिती होत असल्याचे खापर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी नुकतेच केंद्र सरकारवर फोडले होते. या पार्श्वभुमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर निषाणा साधला आहे.

NItin Raut
वाबळेवाडी शाळा बंद पडणार नाही... आमदार अशोक पवारांनी सोडले मौन!

राज्यावर कथित कोळसा टंचाई लादायची आणि दूसरीकडे अर्थपूर्ण संवाद करून खाजगी पुरवठादारांकडून जादा दराने वीज खरेदी करायची, कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडायचे ही नौटंकी उर्जामंत्री नितिन राऊत यांनी बंद करावी, असा सणसणीत टोला अतूल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच, कोल इंडियाने (Coal India) जानेवारी महिन्यातच औष्णिक ऊर्जा केंद्रांसाठी लागणारा कोळसा (Coal) जुलैपर्यंत खरेदी करावा, असे सांगितले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कोळश्याचा साठा करण्यात निष्क्रियता केल्यामुळे आज राज्यावर कोळसा टंचाईचे संकट ओढवले आहे, असा आरोप अतूल भातखळकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर आघाडी सरकारने खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करताना मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.

कोल इंडियाने राज्य सरकारला पत्र लिहून कोळसा आधीच खरेदी करून राज्याकडे असलेल्या बंदिस्त खाणींमध्ये त्याचा साठवण्यास सांगितले होते, मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारने कोळसा खरेदी केला नाही. राज्याला जेवढ्या कोळश्याची गरज आहे तितका कोळसा राज्यसरकारने कोल इंडिया आणि इतर कंपन्यांकडून खरेदी करायला हवा होता. पण कोळसा टंचाईसाठी केवळ कोल इंडियाला दोषी ठरविण्याचे काम नितीन राऊत केले आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे कोल इंडियाची मागची तब्बल तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र कोल इंडियाने राज्याला तीन हजार कोटी रुपये भरणे शक्य नसेल तर एक हजार कोटी रुपये भरून पुढील वर्षभरासाठीचा कोळसा विकत घेण्याची सूचना केली होती. परंतु मे महिना गेला तरी राज्य सरकारने त्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाही.

राज्यावर आभासी कोळसा व वीज टंचाई लादून खाजगी पुरवठादारांकडून दुप्पट दराने वीज खरेदी करण्याचा प्रकार महाविकास आघाडी सरकार करत आहे. याचा सर्वात जास्त भुर्दं राज्यातील जनतेवर पडणार असल्याचा आरोप सुद्धा भातखळकर यांनी यावेळी केला.

`

Related Stories

No stories found.