एसटी संप : अनिल परबांच्या घराबाहेर राडा; घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तेव्हा रस्त्यावर झोपून कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
एसटी संप : अनिल परबांच्या घराबाहेर राडा; घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न
Anil Parabs housesarkarnama

मुंबई : गेल्या पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Strike) आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर शाई फेक आंदोलन केले.

या वेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यानंतर या कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तेव्हा रस्त्यावर झोपून कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. अनिल परब यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रोजच्या पद्धतीचे आंदोलन बघायला मिळतील, असा इशारा संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दिला.

Anil Parabs house
एसटी संपावर वेतनवाढीचा तोडगा?

या सर्व प्रकारावर शिवसेनेच आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली त्यानंतर नाईक अनिल परब यांच्या घरी आले होते. ते म्हणाले, शाई फेकून न्याय मिळणार नाही. अनिल परब चर्चेला तयार आहेत. संघटनेच्या कार्यकरत्यांनी पुढे यावे सर्वसामान्यांना एसटी बंद असल्याने गैरसोय होत आहे. तोडगा हा चर्चेतून निघेल काही लोकं आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

जनशक्ती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे काही कार्यकर्ते गनिमी काव्याने परब यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले. त्यांनी अनिल परब यांच्या घरासमोर निदर्शने केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरानंतर परब यांच्या निवासस्थानासमोर साफसफाईही करण्यात आली.

Anil Parabs house
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील

एसटी मंहामंडळाचे कर्मचारी आझाद मैदानावर शांततेत आंदोलन करत आहे. अन्य एसटी कामगारही राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. सरकारलाही हेच हवे आहे की आंदोलकांचा उद्रेक व्हावा. त्यामुळे त्यांना हा संप चिरडून टाकणे सोपे होईल. त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. तसेच जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाशी एसटी कर्मचारी आणि आपला संबंध नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in