राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर एटीएस पथकाचा छापा; १०३ किलो जिलेटीनचा साठा जप्त
ATS raids Rajasthani trader's house in satara; 103 kg gelatin stocks seized

राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर एटीएस पथकाचा छापा; १०३ किलो जिलेटीनचा साठा जप्त

गोविंदसिंह याच्या घरावराची पोलिसांनी झडती घेतली. मात्र, साठा सापडला नाही. अखेर त्याच्या घरामागील न वापरले जाणारे स्वच्छतागृह पोलिसांनी तपासले. तेथे जिलेटिनच्या स्फोटकांचा साठा सापडला. त्यांनी तो जप्त केला आहे. स्फोटकांचा साठा 103 किलोचा असून हा साठा करण्याची परवानगी नसतानाही गोविंदसिंहने साठा केल्याने त्याला दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तारळे (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) बुधवारी रात्री तारळे (ता. पाटण) येथील राजस्थानी व्यापाऱ्याच्या (Rajasthani trader's) घरावर छापा टाकला. त्यामध्ये तब्बल 103 किलो जिलेटीन (gelatine) स्फोटकांचा साठा जप्त केला. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या कांड्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदसिंह राजपूत (Govindsinh Rajput)  (वय 45, सध्या रा. तारळे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. (ATS raids Rajasthani trader's house in satara; 103 kg gelatin stocks seized)

पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रजपूत सहा वर्षांपासून तारळ्यात रहात आहे. तो मूळचा राजस्थानचा असून विहीर खुदाईसाठी या भागात ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खुदाईसाठी ब्लास्टिंग केले आहे. ब्लास्टिंगचा परवाना असला, तरी जिलेटनचा साठा करण्याची परवानगी नाही, तरीही त्याने साठा केला होता.

साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक प्रताप पाटील, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड अशा वेगवेगळ्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली. 

गोविंदसिंह याच्या घरावराची पोलिसांनी झडती घेतली. मात्र, साठा सापडला नाही. अखेर त्याच्या घरामागील न वापरले जाणारे स्वच्छतागृह पोलिसांनी तपासले. तेथे जिलेटिनच्या स्फोटकांचा साठा सापडला. त्यांनी तो जप्त केला आहे. स्फोटकांचा साठा 103 किलोचा असून हा साठा करण्याची परवानगी नसतानाही गोविंदसिंहने साठा केल्याने त्याला दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिलेटनच्या स्फोटकांचा हा साठा लॉकडाउनच्या काळात गोविंदसिंहने कोठून उपलब्ध केला, त्याचा पोलिस तपास करत आहेत. 

Related Stories

No stories found.