भेटीगाठींना वेग; कार्यकाळ संपताच संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

Sambhajiraje Chhatrapti | Devendra Fadanvis| गुजरात दौऱ्यात संभाजीराजेंनी खासदार रामभाई मोकरिया यांचीही भेट घेतली होती.
भेटीगाठींना वेग; कार्यकाळ संपताच संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट
Sambhajiraje Chhatrapti | Devendra Fadanvis, Sambhaji Raje met Fadnavis, Sambhajiraje Chhatrapti Latest News, Sambhaji Raje met Devendra Fadnavis Twitter/@SambhajirajeChhatrapti

पुणे : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला. आता कार्यकाळ संंपल्यानंतर ते भाजमध्ये प्रवेश करतात की स्वत:चा पक्ष स्थापन करतात की इतर पर्याय निवडतात, येत्या 12 मे रोजी कळणार आहे. तत्पुर्वी त्यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. (Sambhajiraje Chhatrapti Latest News)

''माझा कार्यकाळ संपला, ज्यांनी मला संधी दिली ते फडणवीस आणि मोदी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी भेट घेतली आहे. पण आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यामुळे मला गडकिल्ल्यांचे काम करता आले, त्यासाठी आभार व्यक्त केले. 12 तारखेला जी भूमिका असेल त्यावेळी ती स्पष्ट करेनच. मी १२ तारखेला सर्व गोष्टींवर सविस्तर बोलेनच.

Sambhajiraje Chhatrapti | Devendra Fadanvis, Sambhaji Raje met Fadnavis, Sambhajiraje Chhatrapti Latest News, Sambhaji Raje met Devendra Fadnavis
"राज्यात दंगली घडविण्याचा काहींचा कट" : जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

ओबीसी आरक्षणाचा विषय आहे त्यात कोर्टाच्या निर्देशानुसारच काम करावं लागेल. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं ते सर्वांसाठी होतं, केवळ मराठ्यांसाठी नव्हतं, शाहू महाराजांनी देखील आरक्षण बहुजनांना दिले, त्यामुळे मी देखील बहुजनांसाठी आणि मराठ्यांनाही आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार,'' असल्याचे यावेळी संभाजी राजेंनी सांगितले.

कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय करणार असा सवाल उपस्थित होत असतानाच त्यांनी स्वत:च आपली पुढची दिशा जाहीर करण्यासाठी १२ मे रोजी पुण्यात बैठक बोलवली आहे. आता संभाजीराजे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की! स्वतःचे राज्यात स्वतचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी नवा पक्ष स्थापन करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत तीन मे रोजी संपली आहे. त्यानंतर नुकतेच त्यांनी नवी आपण राजकारणात उतरणार असून लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून ते कोणत्या राजकीय पक्षात जाणार की स्वतःचा राजकीय पक्ष काढून 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मेे रोजी आपण पुण्यातून आपली पुढची भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र त्यापूर्वीच संभाजीराजेंनी भाजपच्या गोटातील महत्वाच्या दोन बड्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेत चर्चा केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकताच गुजरात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे विश्वासु व जवळचे मानले जाणारे राज्यसभा खासदार रामभाई मोकरिया यांची भेट घेत चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण १ तास ही चर्चा सुरु होती. संभाजीराजे यांचा राज्यसभा कार्यकाळ संपण्याच्या दिवशीच ही भेट झाल्याने पुढील वाटचाल भाजपमधून करण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.