Job Vacancy for Transgender : तृतीय पंथीयांना सध्या तरी 'या' पदांच्या भरतीतच संधी...

Job Vacancy for Transgender : एमपीएससीमध्ये तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय
Transgender
Transgender Sarkarnama

Job Vacancy for Transgender : गृह विभागातर्फे होणाऱ्या नोकरभरतीमध्ये तृतीय पंथीयांना तुर्तास तरी संधी मिळणार नाही. मात्र एमपीएससीमध्ये पोलीस भरतीत (police recruitment) तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यासाठी राज्य सरकारने तयारी दाखवली आहे. त्यामुळे तृतीय पंथीयांना तूर्तास तरी गृह विभागाच्या सरसकट सर्व नोकर भरतीत संधी मिळणार नाही. मात्र एमपीएससीमध्ये (MPSC Exam) तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास राज्य सरकारने तयारी दाखवली आहे.

अडीच महिन्यांत तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवण्याचे निर्देश देखील कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. गृह विभागातर्फे (Department of Home Affairs) होणाऱ्या नोकरभरतीमध्ये अर्ज भरताना स्ञी आणि पुरुष असे दोन पर्याय असतात. त्यामध्ये तृतीय पंथीयांसाठी पर्याय नसतो. मात्र आता त्यांच्यासाठी तिसरा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे.

Transgender
Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

त्यामुळे तृतीय पंथी (Transgender) देखील लवकरच शासकीय नोकऱ्यांमध्ये येणार आहेत. एवढंच नाही तर तृतीय पंथीयांची निवड करायची असेल तर अडीच महिन्यांत तृतीय पंथीयांच्या शारिरीक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवा, असे निर्देश हायकोर्टाने (High Court) दिलेत. त्याचबरोबर तृतीय पंथीयांची शारिरीक चाचणी ही २८ फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत.

Transgender
Maharashtra Karnataka Border Dispute : तब्बल ७२ तासानंतर महाराष्ट्र- कर्नाटक एसटी बस सेवा सुरू

एमपीएससीसाठी (MPSC Exam) अर्ज करण्याची मुदत ही १५ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारच्यावतीने (State Govt) न्यायालयामध्ये सांगण्यात आलं. याबाबतची माहिती राज्य सरकार तर्फे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी दिली आहे. (Now opportunity to transgenders)

Transgender
Vasant More News : वसंत मोरेंविषयी मनसेच्या नेत्याचे मोठे विधान : म्हणाले, ‘वसंत मोरे ताकदवान हे....’

दरम्यान, काही तृतीय पंथीयांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरणमध्ये याचिका दाखल करत एमपीएससी परिक्षेचा अर्ज भरण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र फॉर्म भरण्यासाठी गेले असता वेबसाईटवर स्ञी-पुरुष असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी पर्याय नव्हता. तर तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन देखील राज्य सरकारने तरतूद का केली नाही? यासाठी ही याचिका होती. या पार्श्वभूमीवर ही याचिका ग्राह्य धरत कोर्टाने पुढील निर्देश दिले. (Job Vacancy for Transgender)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com