मोठी बातमी : लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता रुग्णालयात 'नो एंट्री'

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे.
asymptomatic covid 19 patients will not be admitted in hospitals in mumbai
asymptomatic covid 19 patients will not be admitted in hospitals in mumbai

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली असून, मुंबईतही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यासाठी महापालिकेने रुग्णालयातील खाटांच्या नियोजनासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि दीर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना आता रुग्णालयात दाखल करून घेण्यात येणार नाही. 

सर्व खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावेत. तसेच, सर्वसाधारण विभागातील 80 टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी आज सर्व रुग्णालयांना दिले आहेत. सर्व रुग्णालयांतील उपलब्ध खाटांचा आढावा घेऊन नियोजन करण्याचे निर्देश सर्व प्रभागाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या खाटांचे नियोजन प्रभागातील 'वॉर रूम'मधून होणार आहे. रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा साठा, व्हेंटिलेटर तसेच इतर आवश्‍यक उपकरणांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे.

लक्षण नसलेले आणि दीर्घकालीन आजार नसलेले कोरोनाबाधित काही वेळा खासगी रुग्णालयात परस्पर दाखल होतात. याला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी सर्व खाटांचे नियोजन प्रभागाच्या 'वॉर रूम'मधून करण्यात येईल. लक्षण नसलेले आणि कोणताही दीर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश देऊ नये, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

रुग्णालयात रुग्णांना प्रवेश देण्याचा प्राधान्यक्रम प्रशासनाने ठरवला आहे. यात पहिल्यांदा प्रभागातील खासगी नर्सिंग होम्स आणि रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर कामगार रुग्णालये नंतर प्रभागाबाहेरील खासगी रुग्णालये, सरकारी आणि शेवटी महापालिकेच्या रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सर्व रुग्णालये, कोरोना केंद्राचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी रुग्णालयांसाठी राज्य सरकारने दरपत्रक ठरवले असून, त्यानुसारच उपचार करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. यावर महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष ठेवून असणार आहेत. 

मुंबईत आज सापडले 5 हजारांहून अधिक रुग्ण 

मुंबईत आज 5 हजार 888 नवीन कोरोना रुग्ण सापडले. आज 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. सक्रिय रुग्णही वाढले असून, येत्या काही दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 47 हजार 453 हजारांचा टप्पा ओलांडेल. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com