Rahul Narvekar
Rahul Narvekarsarkarnama

assembly speaker election : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोण आहेत ?

नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी (assembly speaker election) निवडून आलेले राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)भाजपचे (bjp) आमदार आहेत. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. (Rahul Narvekar latest news)

नार्वेकरांना १६४ तर आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.

नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Rahul Narvekar
आता ही पुडी कोणी सोडली ? ; शिवसेनेचे खासदार संतप्त
  • नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती.

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये सामील झाले.

  • आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.

  • राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

  • राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते.

  • त्याचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत.

  • राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com