BJP-Shinde group Dispute : भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला: शिंदे गटावर गंभीर आरोप

या घटनेसंदर्भात ‘भाजप ठाणे’ या ट्विटरवर खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे.
BJP-Shinde group Dispute
BJP-Shinde group Dispute

Shinde group-BJP News : राज्यातील ऐतिहासिक संत्तांतरानंतर मांडीला मांडी लावून शिंदे -फडणवीस सरकार राज्याचा गाडा हाकत आहे. असे असतानाच ठाण्यातील वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हा हल्ला शिंदे (Eknath Shinde) गटाच्या माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे, असा गंभीर आरोपच भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशांत जाधव असे हल्ला झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परबवाडी परिसरात फलक लावले जात असताना या शिंदे गटातील कार्यकर्ते आणि प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. हा वाद पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले. पण, शुक्रवारी संध्याकाळी अचानक १५ ते २० जणांनी जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

BJP-Shinde group Dispute
Legislative Council Election : विधान परिषदेसाठी भाजपची रणनीती ठरली ;'या' नावाची चर्चा

या घटनेनंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या सांगण्यावरुनच हा हल्ला केला जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात ‘भाजप ठाणे’ या ट्विटरवर खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारानंतर पुन्हा एकदा ठाण्यातील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.

या हल्ल्यानंतर भाजपचे कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर याप्रकाराचा निषेध केला आहे. “हीच का बाळासाहेबांची शिकवण?” अशा शब्दांत भाजपने निषेध व्यक्त केला आहे. इतकचं नव्हे तर, आमच्या सोबत अशी घटना तिसऱ्यांदा घडली असल्याचा आरोपही प्रशांत जाधव यांनी केला आहे. अशी दहशत पसरवणाऱ्या तेथील स्थानिक माजी नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिद्धेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com