अशोक चव्हाणांच्या मनात चाललंय तरी काय? विश्वासदर्शक ठरावास समर्थकांसह गैरहजर!

यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे आमदार आज उपस्थित राहिले नाहीत, याबाबत अचंबित व्हायची गरज नाही.
Ashok Chavan News, Maharashtra Assembly session news
Ashok Chavan News, Maharashtra Assembly session newsSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि समर्थक आमदार विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिले, त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, काँग्रेस फुटणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. चव्हाण यांच्या मनात चाललंय तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Ashok Chavan and supporting MLA absent during the vote of confidence)

दरम्यान, यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे आमदार आज उपस्थित राहिले नाहीत, याबाबत अचंबित व्हायची गरज नाही. आमच्यात कुणीही नाराज नाही.(Ashok Chavan News)

Ashok Chavan News, Maharashtra Assembly session news
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे ७ आमदार बहुमत चाचणीस गैरहजर; राष्ट्रवादीच्या दोघांची दांडी

एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेत १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्या विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला काँग्रेसचे आमदार अनुपस्थित होते. यामध्ये अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, विजय वडेट्टीवार, झिशांत सिद्दीकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी, माधवराव जवळगावकर यांचा समावेश आहे.

Ashok Chavan News, Maharashtra Assembly session news
सत्तांतर होताना, बंदूक काँग्रेसच्या खांद्यावर ठेवायला नको होती...

काँग्रेसच्या आमदारांपैकी प्रणिती शिंदे या परदेशात न्यूयॉर्कमध्ये आहेत, तर आमदार जितेश अंतापूरकर यांचे कालच लग्न झाले आहे, त्यामुळे हे दोघे काल आणि आज बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी गैरहजर होते. मात्र, इतर नेत्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. नेमके मतदानावेळी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे आमदार नाराज आहेत का, काँग्रेस फुटणार की काय चर्चा रंगली आहे.

Ashok Chavan News, Maharashtra Assembly session news
शिवसैनिकांचे रक्त सांडविण्याचा डाव, एकनाथराव परत या : भास्कर जाधवांचा घणाघात

कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सांगितले की, विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार आज उपस्थित राहिले नाहीत, याबाबत अचंबित व्हायची गरज नाही. आम्हाला फक्त दोन ते तीन मिनिटांचा उशीरा झाला. आम्ही लाॅबीत होतो, तेव्हा त्यांनी विधानसभेचे दरवाजा बंद केले. याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले होतेच. संभ्रम निर्माण करू नका. आमच्यामध्ये कुणीही नाराज नाही.

नव्या सरकारचं तसंही १६४ चं बहुमत झालं होतं, त्यामुळे त्याचा कोणताही दुसरा अर्थ काढू नये. नवीन सरकारावर मी कुठलंही भाष्य करणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊद्यात. त्यानंतर त्यासंदर्भात बोलता येईल. शिवाय, शिवसेना पहिल्यापासून आहे त्याच भूमिकेत आहेत. गटनेता प्रतोद हे विषय न्यायालयात आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com