'छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेने त्यांचा अपमान अन् अनादरच केला!'

भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Ashish Shelar, Uddhav Thackeray
Ashish Shelar, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला. 'जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेने त्यांचा अपमान केला, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला. (Ashish Shelar Latest Marathi News)

आशिष शेलार मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेलार म्हणाले, 'एका गोष्टीचा खेद वाटतो ज्यावेळी आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अपमान किंवा अनादरच केला आहे. त्याचे कारण मला माहिती नाही. छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर, अपमान शिवसेनेने केला तेवढा कोणीच केला नाही. म्हणून आपण बघितले असेल कधी विश्वविख्यात प्रवक्ते छत्रपतींच्या वंशजांच्या घराण्याचे पुरावे मागतात, असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar, Uddhav Thackeray
शिवसेना पडली बाजूला अन् मराठा संघटनांच्या हिट लिस्टवर आले संजय राऊत!

ज्या वेळी छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा, पक्षाची अट घातली जाते हे सुद्ध चित्र अपण बघितले आहे. भाजपचे संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेत पाठवले. राष्ट्रपतींनी पाठवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सन्माम केला हे अख्या महराष्ट्राने पाहिले, असेही शेलार म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातीलच संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे.

Ashish Shelar, Uddhav Thackeray
'संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यास ठाकरे, अजितदादा आणि थोरातांच्या घरात घुसणार'

शिवसेना एक कडवट मावळा राज्यसभेत पाठवणार आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात असेही ते म्हणाले. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आता संपला आहे, असेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आता संभाजीराजे यांच्या ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे फायनल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत आणि संजय पवार हे शिवसेनेच्या वतीने राज्यसभेत असणार आहेत. संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, म्हणूनच त्यांना पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिले होते. या आधी शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे. मालोजीराजेंनी काँग्रेसमधून आणि स्वत: संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छत्रपतींना कोणत्याही पक्षाचे वावडे नसावे, असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com