मुंबई महापालिका : शेलारांची स्टॅटेजी; 'त्या' 20 जागांवर विशेष लक्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्याने राजकारण तापले आहे.
Ashish Shelar, Amit Shah
Ashish Shelar, Amit Shahsarkarnama

Ashish Shelar : मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याने राजकारण तापले आहे. शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर आता भाजपने (BJP) मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी जोरात तयारी सुरू केली आहे. अमित शहा (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मिशन १३५ पूर्ण करण्यासाठीची स्टॅटेजी सांगितली.

लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर शहा यांच्या उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसेच या बैठकीला मुंबईतील भाजपचे काही माजी नगरसेवकही उपस्थित होते.

Ashish Shelar, Amit Shah
Imtiaz Jalil : धनदांडग्यांना कर्जाची खैरात वाटायला सरकारी बॅंका कराडांची जहागीर आहे का ?

या बैठकीमध्ये बोलताना शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'मिशन १३५'ची घोषणा केली. मुंबई महापालिकेत सध्या २२७ जागा आहेत. त्यापैकी १३५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठरवले. बैठकीत पदाधिकाऱ्यांना बोलताना शेलार म्हणाले, '२५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे. आगामी महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढाई लढू, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

Ashish Shelar, Amit Shah
अरविंद सावंतांचे अमित शहांना प्रत्युत्तर; बंगाल, पंजाब अन् दिल्लीसारखी परिस्थिती होईल

तसेच यावेळी शेलार म्हणाले, ' 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने १५ ते २० जागा थोड्या फरकाने गमावल्या. भाजपच्या उमेदवारांचा या जागांवर १०० ते १५० मतांनी पराभव झाला. त्या जागांवर आता विशेष लक्ष देणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले. या जागा जिंकण्यासाठी आता ताकद लावू, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in