आम्हाला डोळा मारू नका : आशिष शेलारांचा सेनानेत्यांना असाही सल्ला

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री हे अमित शहा (Amit Shah) यांना भेटत असल्याचा संदर्भ दिला होता..
संजय राऊत आणि अॅड. आशिष शेलार
संजय राऊत आणि अॅड. आशिष शेलारsarkarnama

मुंबई : ठाकरे सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस नेत्यांतील चढाओढीच्या राजकारणावर बोट ठेवत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आणि 'तुमच्या कुरघोड्या संपवा, आम्हाला डोळा मारून नका,' असा सल्लाही त्यांनी राऊत यांना दिला.

शिवसेनेशी दुश्मनी नसल्यानेच गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते; हे रोज सकाळी तुतारी फुंकणाऱ्यांनी पाहावे, असा टोमणाही शेलार यांनी राऊत यांना लगावला.

संजय राऊत आणि अॅड. आशिष शेलार
आशिष शेलार म्हणाले, सरकारमधील वसुलीबाज वाझे शोधा 

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, 'ईडी हे भाजपचे उपकार्यालय असून, `त्यांनी भुंकायचे आणि यांनी धावत सुटायचे,' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप, 'ईडी'वर घणाघात केला. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा समाचार घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याच्या मुद्यावरून पवार यांना डिवचताना मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत असल्याचा दाखला राऊत यांनी शिवसेनेच्या बैठकीत पुण्यात दिला होता. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी आता शिवसेनेलाच सुनावले.

शेलार म्हणाले, "बँकांत डाका टाकणाऱ्या शिवसेना वाचवत आहे का. सहकारी बँकेमधील सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात झाल्याचा 'आरबीआय'चा अहवाल असल्याचे सांगून, 'ईडी' च्या कारवाया योग्य आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून आरोग्य खात्याचा कारभार झाकणार नाही. टोपे यांच्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कठोर कारवाई करावी. परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीच्या तपासात सहकार्य करीत नाहीत. हे दुदैवी आहे. आपली बाजू चौकशीला सामोरे जाऊन सिध्द करावी."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com