पवारांना भेटण्यासाठी शेलार सिल्व्हर ओकवर पोहचले अन् अचानक घेतला यू टर्न

Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात शेलार हे पवारांची भेट घेणार होते.
Sharad Pawar, Ashish Shelar
Sharad Pawar, Ashish Shelarsarkarnama

Ashish Shelar : मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी 'सिल्व्हर ओक'वर जात होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात शेलार हे पवारांची भेट घेणार होते. मात्र, माध्यम प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्यांनी भेट घेणे टाळले. शेलार यांनी पवारांच्या (Sharad Pawar) घरी न जाता बाहेरुनच आपला मोर्चा माघारी वळवला. यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक २८ तारखेला होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) समोरा-समोर येणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये संदीप पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर, विजय पाटील, नवीन शेट्टी हे उमेदवार आहेत.

Sharad Pawar, Ashish Shelar
अतुल सावेंना सहकारातील कितपत माहिती? : राजू शेट्टींचे नव्या सहकार मंत्र्यांबाबत विधान

यामध्ये शरद पवार यांचा पाठिंबा संदीप पाटील यांना असल्याचे सांगितले जाते. तर देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा अमोल काळे यांना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही नेते समोरा-समोर येणार आहेत. याच निवडणुकीसंदर्भात पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी बैठक बौलवण्यात आली होती. त्या बैठकीसाठी आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत, अशी बातमी आली होती.

Sharad Pawar, Ashish Shelar
नांगरे-पाटील, गुप्ता, आरती सिंह यांच्यासह २३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या सप्टेंबरअखेर बदल्या?

त्यानुसार शेलार हे सिल्व्हर ओकवर गेले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे पाहिल्यानंतर शेलार मागारी फिरले. शेलार मागारी फिरल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली. शेलार यांनी सिल्व्हर ओकवर न जाता मागे फिरले त्यामुळे असे नेमके काय झाले की शेलार पवारांची भेट न घेता परतले याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com