सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली!

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी केली.
 Ashish Shelar, Uddhav Thackeray

Ashish Shelar, Uddhav Thackeray

sarkarnama

मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation) तोंडावर नववर्षाची भेट देत शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे १६ लाख घरांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. त्यानंतर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

हिवाळी अधिवेशनात घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता कायद्यात सुधारणा करण्याकरिता सरकारला प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

<div class="paragraphs"><p> Ashish Shelar, Uddhav Thackeray </p></div>
शिवसेनेचा आग्रह, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिली. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिली. विदेशी दारुला करात ५० टक्के सुट दिली. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली!,'' असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

आतापासूनच नव्हे तर वचन दिले त्या तारखे पासून 500 चौ. फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा! अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरे 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500 चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु. पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का, असा सवाल शेलार यांनी केला आहे. येत्या निवडणुकीत याचा सुपडा साफ होणार हे कळताच मालमत्ता कर माफ केले, असा आरोपही त्यांनी केला.

<div class="paragraphs"><p> Ashish Shelar, Uddhav Thackeray </p></div>
राज्यावर ओमिक्रॉनचे संकट आणि सोनिया गांधीचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची तक्रार राज्यपालांकडे करण्याची वेळ आली. बिल्डरांच्या फायद्यासाठी आश्रय योजनेचा आधार घेतला जात आहे. लोकांचे पैसे लाटले जात असतांना भाजप गप्प बसणार नाही, असेही शेलार म्हणाले. काल मुख्यमंत्री म्हणाले आम्ही केवळ चांदतारे दाखवत नाही. मुख्यमंत्री यांना घोषणा करतांना चांदतारे आठवत आहे. विचारधारा बदलली की रंग ही बदलतात, असा टोला शेलार यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकीत हिरवा झेंडा जरी त्यांनी आणला तरीही आम्ही त्यांना असमान दाखवू, अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com