'पेंग्विन सेना' म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचले!

Ashish Shelar : सांग सांग भोलानाथ हा दंड पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?
Ashish Shelar, Uddhav Thackeray
Ashish Shelar, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्षांच्या आरोप - प्रत्यारोपांना उधाण येत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. नुकतंच राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. घनकचरा तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावून पर्यावरणाला हानी पोहोचवल्या प्रकरणी कलम १५ अंतर्गत लवादाने ही कारवाई केली होती. दोन महिन्यांत राज्याला हा दंड भरावा लागणार आहे. न्या.आदर्शकुमार गोयल यांच्या पीठाने हा आदेश दिला होता. यावरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोप होत आहेत.

आशिष शेलार ट्विट करत म्हणाले, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला दंड दोन महिन्यात भरायचा आहे. मग आता सांग सांग भोलानाथ हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून, अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मिडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून, वसूल करायचा का?" हरित लवादाच्या कारवाईसाठी भाजपने शिवसेनेला जबाबदार धरले आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा प्रचारात येऊन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Ashish Shelar, Uddhav Thackeray
धक्कादायक ! BMC निवडणुकीत उमेदवारी देण्याचा बहाण्याने बलात्कार: मनसे पदाधिकारी अटकेत

दरम्यान कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हंटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com