
नागपूर : "विदर्भातील लोकांना त्यांचे संवैधानिक हक्क मिळत नाहीत. त्यामुळे वेगळा विदर्भ (vidarbha)व्हावा," अशी भूमिका अनेकांनी यापूर्वी मांडली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (ashish deshmukh) यांनीही ही मागणी आता लावून धरली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) याबाबत पत्र लिहिलं आहे. (ashish deshmukh news update)
"देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ छोटी राज्य करा," अशी मागणी देशमुखांनी मोदींकडे केली आहे. यासाठी त्यांनी अमेरिका आणि स्वित्झर्लन्डच्या राज्यांचे उदाहरण दिले आहे. विदर्भाच्या अनेक प्रश्नांवर उत्तर कसे शोधणार, असा प्रश्न ही देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती खालावलेली असताना तो एका राज्याएवढी लोकसंख्या असलेल्या विदर्भाच्या समस्या महाराष्ट्राकडून कशा सोडविल्या जाऊ शकतात असा प्रश्न आशिष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या राज्याची लोकसंख्येचा विचार करता ही नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे सुजलाम सुफलाम राज्ये घडविण्यासाठी 75 छोटी राज्ये करण्यात यावी, याची सुरुवात 15 ऑगस्टला वेगळ्या विदर्भाची घोषणा करून करावी. नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या राज्यांचे दरडोई उत्पन्न दुपट्ट झाले आहे. विदर्भ मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, नक्षलवाद, असे अनेक गंभीर प्रश्न कायम दुर्लक्षित आहे.
फक्त 29 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमुळे भारतातील विविधता अपूर्ण आणि अयोग्यरीत्या व्यक्त केली जात आहे. 75 राज्याच्या लोकसंख्या 2 कोटी असेल तर लोकसभेत प्रत्येकी 10 खासदार निवडून यावे, आणि निवडणुका एकत्रित व्हाव्यात. विदर्भ अजूनही मुलभूत सोयी सुविधासांठी झगडतोय.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.