Ashadhi Wari 2023 : शिंदे सरकारकडून वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय..

Mukdarshan will continue During the Official Mahapuja : विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा.
Ashadhi Wari 2023 :
Ashadhi Wari 2023 :Sarkarnama

Pandharpur News : हरिनामाचा गजर करत राज्याच्या अनेक भागातील मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ आणि मुक्ताईंच्या पालख्या एक ते दोन दिवसांत पंढरपुरात दाखल होणार आहे. अशातच शिंदे - फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. (Ashadhi Wari 2023 mukdarshan of vitthal rukmini will continue during the official mahapuja)

Ashadhi Wari 2023 :
BRS Entry in Maharashtra Politics : मोठी बातमी : BRS ने महाराष्ट्रात खातं उघडलं ; मराठवाड्यात..

येत्या २६ जून रोजी आषाढी वारी असल्याने राज्यभरातून वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते.

या काळात राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी दर्शनासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाचरणी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, या काळात वारकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Ashadhi Wari 2023 :
Sanjay Raut ON Manipur Violence : मणिपूर जळत असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर ; राऊतांचा घणाघात

या निर्णयाने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय ऐकताच वारकऱ्यांनी टाळ-मृदुगांच्या घोषात जलोष केला. वारीसोहळ्याबाबत इतिहासात पहिल्यादांच असा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी पंढरपूरच्या पांडुरंगाचे मुखदर्शन सुरू राहणार आहे. यापूर्वी महापूजा होईपर्यंत चार तासासाठी दर्शन बंद करण्यात येत होते. मात्र, या वर्षी मुखदर्शन सुरू राहणार असल्याने दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वारी काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ व‌ जलद व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या कालावधीत मुखदर्शन सुरू राहणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com