RSS चे कौतुक करणाऱ्या ममता बॅनर्जींवर ओवेसी संतापले

Mamata Banerjee : संघातील काही लोकांना भाजप आवडत नसल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या. त्यांच्या या विधानवर ओवेसी संतापले आहेत.
Asaduddin Owaisi|AIMIM|
Asaduddin Owaisi|AIMIM|sarkarnama

हैदराबाद : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) नुकतेच एक विधान केले आहे. या विधानावरुन राजकारण पेटलं आहे. एमआयएचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

एका सरकारी कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नुकतेच भाष्य केले आहे.२००३ मधील एका विधानाचा आधार घेत ममता बॅनर्जी यांच्यावर ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. संघाचे कौतुक केल्यामुळे ओवेसी यांनी ममतांवर नाराजी व्यक्त केले आहे. त्यांच्या विधानाचा ओवेसी यांनी समाचार घेतला आहे.

"संघाचे लोक एवढे खराब नाहीत. त्यांच्यातही चांगले लोक आहेत. एक दिवस ते देखील मोदी सरकार विरुद्ध उठाव करतील, असा मला विश्वास वाटतो," असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. संघातील काही लोकांना भाजप आवडत नसल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या. त्यांच्या या विधानवर ओवेसी संतापले आहेत.

ओवेसी म्हणाले, "ममता बॅनर्जी या मूळातच संघाच्या पक्षपाती आहेत. त्यांना आजच संघाचा कळवळ आलेला नाही. यापूर्वी देखील त्यांनी संघाची स्तुती केली होती,"

ओवेसी यांनी त्यासाठी २००३ मध्ये एका घटनेचा उल्लेख केला आहे. "ममता बॅनर्जी यांना संघ “दूरचा” वाटत नव्हता आणि संघाला देखील हिंदू राष्ट्र बनवायचे असल्यामुळे त्यांना देखील ममता बॅनर्जी फारशा “दूरच्या” नाहीत. मुस्लिमांचा द्वेष हा दोघांमधला कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी संघाची स्तुती करणे स्वाभाविक आहे. तृणमूळ काँग्रेस मधले मुस्लिम नेते आता ममतांच्या संघ स्तुतीवरून देखील काही मखलाशी करतील, असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे.

Asaduddin Owaisi|AIMIM|
NIA च्या रडारवर 'डी' गँग ; दाऊद इब्राहिमची माहिती द्या, 25 लाखांचे बक्षीस मिळवा

"2003मध्ये आरएसएसचे कौतुक करताना बॅनर्जी यांनी आरएसएसला देशभक्त म्हटलं होते. त्यावर आरएसएसने त्यांना 'दुर्गा'म्हणून संबोधले होते," असे ओवेसी यांनी म्हटलं आहे. "संघाचे स्वयंसेवक समाजातल्या सर्व घटकांची काळजी घेतात. ते सीमावर्ती इलाख्यामध्ये सुदूर पोहोचतात. निरपेक्षपणे काम करत राहतात, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी संघाचे कौतुक केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com