Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड स्टेजवर आले इतक्यात स्टेजचा काही भाग कोसळला; नेमकं काय घडलं?

Thane News : कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले म्हणून...
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama

NCP : ठाण्यातील मुंब्रा येथे आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत एक छोटीशी दुर्घटना घडली. मात्र, कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

नेमकं काय घडलं?

मुंब्रा येथे आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मैदानाच्या बाजूला स्टेज उभारण्यात आला होता.

Jitendra Awhad
Mla Meghna Bordikars Holi : मेघना बोर्डीकरांनी साजरा केला बंजारा समाजासोबत होलीकोत्सव..

या कार्यक्रमासाठी जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर पोहोचले. स्टेजवरून चालत आले आणि पुढे खुर्ची जवळ पोहोचले. खुर्चीवर बसणार इतक्यात स्टेजचा एक भाग अजानक खचला.

स्टेजचा एक भाग अचानक खचल्यामुळे आव्हाडांचा तोल गेला. मात्र, याच वेळी त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांचा हात पकडत धोकादायक असलेल्या स्टेजपासून बाजूला नेलं.

तसेच सर्वच जण बाजूला झाले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in