Ajit Pawar : अंकल अंकल काकीला सांगीन..अजित पवार असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला; नेमकं काय घडलं?

Maharashtra News : अजित पवार अंकल अंकल असं नेमकं कुणाला म्हणाले?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसी अनेक महत्वाच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली. तसेच विरोधकांनी सरकारला धारेवर धरत घेरण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र, याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते गिरीज महाजन यांना खोचक टोला लगावला.

Ajit Pawar
Delhi News : दिल्लीच्या राजकारणात खळबळ; केजरीवाल सरकारमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा

अजित पवार सभागृहात बोलत असताना ते कांद्याचा प्रश्न, सरकारने जाहिरातबाजीवर केलेला खर्च अशा अनेक मुद्द्यावरून सरकावर टीका करत होते. यावेळी ते बोलत असताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याच वेळी अजित पवार यांच्या पाठिमागे बसलेल्या धनंजय मुंडे यांनी महाजन यांना अंकल अंकल म्हणत चिडवलं. हे ऐकून अजित पवारही आपल्या भाषणात म्हणाले, ''अंकल अंकल काकीला सांगीन.. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल.." असं म्हणताच सभागृहात मोठा हशा पिकला.

Ajit Pawar
Bacchu Kadu News : तुम्ही शेतकऱ्यांशी गद्दारी का केली? आजोबांनी बच्चू कडूंना रस्त्यातच सुनावलं

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, कधी-कधी असे मजामस्तीचे क्षणही पाहायला मिळतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in