Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर जाणार, विरोधकांची मोट बांधणार?

Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : मोदींचा रथ रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधणार!
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray
Arvind Kejriwal Meet Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री शिंदेंना बहाल झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अँक्शन मोडवर आलेले दिसून येत आहेत. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपविरोधी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray
NVCC : माजी अध्यक्षाच्या तक्रारीवरून विद्यमान अध्यक्षावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे हे मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या नेत्यांची भव्य सभा आयोजित करण्याच्या तयारीत, असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता ठाकरे हे पंतप्रधान मोदींचा रथ रोखण्यासाठी अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहेत.

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यानंतर या दोन्ही नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर जाणार आहेत. या बैठकीत विरोधा पक्षांनी कसं एकत्र आलं पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray
Kasba By-Election : 'गद्दारांविरूद्ध पहिलं बंड पुण्यातून होणार ; आदित्य ठाकरेंची भविष्यवाणी !

काँग्रेसला सोबत घेऊनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती आखली जावी, असा प्रस्ताव ठाकरे हे केजरीवालांना सादर करतील, अशी शक्यता आहे. यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यानंतर अरविंद केजरीवाल याला कसा प्रतिसाद देतील, काय भूमिका घेतील, याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com