Dasara Melava : आम्हीच खरी 'शिवसेना' हे दाखवण्यासाठी ठाकरे-शिंदे गट सज्ज , गर्दी जमविण्याचे 'टार्गेट'

Dasara Melava : शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात असला तरी तेथे निर्णय लागण्याआधीच याचा निकाल दसऱ्याला लागेल, असा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही मुंबईत दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेचे (shiv sena) दोन्ही गट शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. (dasara melava latest news)

शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात लागण्याआधी दसऱ्याच्या दिवशी आम्हीच खरी “शिवसेना’हे दाखवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्धार केला आहे.

दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून मेळाव्याला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला असून ३ लाख लोक गोळा करण्याचे नियाजन आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यास सांगितले.शिंदे गटाचा यंदा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहेत, तर ठाकरे गटाचा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर दसरा मेळावा होणार आहे. शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात असला तरी तेथे निर्णय लागण्याआधीच याचा निकाल दसऱ्याला लागेल, असा दावा दोन्ही गटांनी केला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
मोदींबाबतच्या 'त्या' विधानावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण ; म्हणाल्या..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पहिल्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी औरंगाबाद शहर, जिल्ह्यातून दहा हजार वाहनांचे नियोजन केले आहे. २५ हजार शिवसैनिक त्यात असतील. प्रवासाच्या नियोजनासाठी ३० सप्टेंबर रोजी संत एकनाथ नाट्यगृहात दुपारी बारा वाजता महत्त्वपूर्ण बैठक होत आहे, अशी माहिती महानगराध्यक्ष तथा आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या वेळी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जिल्हाध्यक्ष रमेश पवार, राजू आहिरे, गणेश पवार, संदीप जाधव, रमेश सूर्यवंशी, धीरज पवार आदींची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरेंनी देखील बैठकांचा सपाटा लावला असून साधरणत: दीड ते २ लाख कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्याचे आदेश दिले असून शिवाजी पार्कासाठी २० हजार अनामत रक्कमही मनपात जमा केली आहे. दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पदाधिकाऱ्यांना सूचना

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाने औरंगाबाद जिल्ह्यातून तब्बल १० हजार वाहनांतून २५ हजार जणांना नेण्याचे नियोजन केले आहे, तर उद्धव सेनेच्या गटाने ३ हजार वाहनांतून १५ हजार कार्यकर्त्यांना मुंबईत नेण्याची तयारी केली आहे. दाेन्ही गटांकडून शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

५०० बसेसची मागणी

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजारहून अधिक शिवसैनिक मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यासाठी ३५० बसेसचे नियोजन झाले असून मतदारसंघातून ५०० बसेसची मागणी होत असल्याचे सत्तार म्हणाले.

दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून मेळाव्याला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार दोन्ही गटांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in