शिवसेनेला थोपविण्यासाठी आप निवडणुकीच्या रिंगणात ; प्रीती शर्मा मेनन यांच्यावर जबाबदारी

आपने प्रीती शर्मा मेनन (preeti sharma) यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
शिवसेनेला थोपविण्यासाठी आप निवडणुकीच्या रिंगणात ;  प्रीती शर्मा मेनन यांच्यावर जबाबदारी
preeti sharma,Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर (BMC) सत्ता मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसे यांनी कंबर कसली आहे. यात आता आम आदमी पार्टीनेही (aam aadmi) एन्ट्री घेतली आहे.

मुंबईच्या सत्ताकारणात शिवसेनेला थोपविण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात आपने उडी घेण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी आपने राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन (preeti sharma) यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

आप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी ही घोषणा केली आहे. आम आदमी पार्टी सर्व म्हणजे २३६ जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले.

preeti sharma,Uddhav Thackeray
राज यांच्या सभेला गृहमंत्र्यांनी परवानगी का दिली ? इम्तियाज जलील यांनी सांगितलं कारण..

मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहसचिव अंकुश नारंग यांची नुकतीच प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रीती शर्मा मेनन म्हणाले, "पक्षाने मला दिलेली कोणतीही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारते आणि मला सेवेची संधी दिल्याबद्दल अरविंद केजरीवालजींचे आभार मानते. मुंबई ही माझी “जन्मभूमी” आणि “कर्मभूमी” आहे,"

preeti sharma,Uddhav Thackeray
राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, दोन मराठी कलाकारांच्या गाडीचे नुकसान

प्रीती शर्मा मेनन या इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक आहेत. सिंचन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. प्रीती शर्मा मेनन या यशस्वी उद्योजक असून त्यांनी महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला कॅब सेवा सुरू केली.

भष्ट्राचाराच्या विरोधात लढणारे व्यक्तिमत्व म्हणून मेनन यांच्याकडे पाहिलं जाते.सेव्ह आरे आंदोलनात त्यांनी लढा दिला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नधान्यपुरवठामंत्री छगन भूजबळ यांच्यावर मेनन यांनी भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा मेनन यांनी उघडकीस आणला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.