जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत झाल्याने कॉंग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय आहेत.
जिल्हा परिषदेतील पराभवानंतर पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील
Prafull Patil Sarkarnama

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत (Palghar ZP Election) कॉंग्रेस (Congress) पक्षाचा पुरता सुफडासाफ झाला असून सर्व उमेदवार पराभूत झालेत. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करत विद्यमान अध्यक्ष दिवाकर पाटील (Divakar Patil) यांना पदावरून हटवले असून त्यांच्या जागेवर प्रफुल्ल पाटील (Prafull Patil) यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

Prafull Patil
एनसीबीबाबत नवाब मलिकांना पोटशूळ: प्रवीण दरेकरांचा पलटवार

एकेकाळी ठाणे आणि पालघरवर राज्य करणारा काँग्रेस पक्ष जिल्ह्यात संघटनात्म पातळीवर अत्यंत कमकुवत बनला आहे. कॉंग्रेसचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता अस्तित्वच शिल्लक राहतं की नाही, अशी स्थिती आहे. नुकताच झालेल्या जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचं पानिपत झालं. त्यामुळे पालघर जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

पाटील हे वाडा तालुक्यातील देवघर गावाचे रहिवासी असून सरपंच ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. देवघर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर कुणबी सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते वाडा पंचायत समितीचे उपसभापतीपदही त्यांनी भूषविले. तर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्षपदासह विविध पदांवर त्यांनी काम केलंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कुणबी सेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. एक शेतकरी आंदोलका सोबतच प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

''पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझयावर सोपविली आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहता सर्वात अगोदर संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचं मोठं आव्हान आहे. केंद्रसरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढून कॉंग्रेसपक्ष जिल्ह्यात उभा करू.''

(प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष, पालघर कॉंग्रेस)

Related Stories

No stories found.