धक्कादायक : तब्बल वीस लाखांची लाच घेताना कर आयुक्तच अडकले सापळ्यात

हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली होती 30 लाख रुपयांची लाच...
Anti Corruption Raid Latest Marathi News
Anti Corruption Raid Latest Marathi NewsSarkarnama

ठाणे : भ्रष्टाचाराचं कुरण समजलं जाणाऱ्या महसूल विभागात अनेकदा लाच स्वीकारताना कनिष्ठ कर्मचारी, अधिकारी अडकतात. पण मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तब्बल 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहायक राज्य कर आयुक्तांनाच रंगेहाथ पकडले. त्यामुळे या विभागात खळबळ उडाली आहे. (Anti Corruption Raid Latest News)

धनंजय जनार्दन शिरसाठ असं या सहायक आयुक्तांचं नाव आहे. ते ठाण्यातील विक्रीकर विभागात कार्यरत आहेत. लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कापुरबावडी येथील एका हॉटेल व्यावसायिकाने शिरसाठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Anti Corruption Raid Latest Marathi News
महाविकास आघाडीचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? शेलारांसह दरेकर, महाजनांवर मोठी जबाबदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे कापुरबावडी येथे हॉटेल असून त्याचे मागील वर्षाचे असेसमेंट न करण्यासाठी व नवीन जीएसटी नंबर काढून देण्यासाठी शिरसाठ यांनी 30 लाख रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत लालचुलपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर आठ जून रोजी केलेल्या पडताळणीमध्ये शिरसाठ यांनी 30 लाखांची मागणी करून त्यातील 20 लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले.

Anti Corruption Raid Latest Marathi News
विरारचे ठाकूर कुणाचं गणित बिघडवणार? मित्राची भेट घेत ‘भाईं’नी घातलं साकडं

लाचलुचपत विभागाच्या ठाणे शाखेने सापळा रचून शिरसाट यांना 20 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शिरसाठ यांच्यावर ही कारवाई झाल्याने राज्याच्या विक्रीकर विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com