Sanjay Gaikwad : मंगलप्रभात लोढांनंतर आमदार संजय गायकवाडांचं आणखी एक वक्तव्य; म्हणाले...

Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदे हे बेईमान व्यक्ती नाहीत...
Sanjay Gaikwad latest news 
Eknath shinde 
Chhatrapati shivaji maharaj
Sanjay Gaikwad latest news Eknath shinde Chhatrapati shivaji maharaj Sarkarnama

Sanjay Gaikwad News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार रान पेटवलं जात आहे. ही प्रकरणं ताजं असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा नवीन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गायकवाड म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे, यात काहीही दुमत नाही. पण एकनाथ शिंदे हे बेईमान व्यक्ती नाहीत. शिवाजी महाराजांनी देखील वेळप्रसंगी गनिमी कावा केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी देखील वापरला आहे असं गायकवाड यावेळी म्हणाले आहेत.

Sanjay Gaikwad latest news 
Eknath shinde 
Chhatrapati shivaji maharaj
Devendra Fadanvs : भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी डागली शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ...

तसेच यापूर्वी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानं केली होती, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य ती समज दिली गेली आहे. त्यामुळे ती लोकं पुन्हा असं काही बोलतील असं वाटत नाही अशी माहितीही आमदार संजय गायकवाडांनी ( Sanjay Gaikwad) दिली.

Sanjay Gaikwad latest news 
Eknath shinde 
Chhatrapati shivaji maharaj
Sadabhau Khot : राज्यकर्ते हे रेड्यांचीच औलाद : सदाभाऊ खोतांंचं वक्तव्य!

काय म्हणाले होते संजय राऊत?

मंगलप्रभात लोढा हे राज्याचे पर्यटनमंत्री असून त्यांना किमान शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक महाराष्ट्रात येतात. इतकेच नव्हे तर आग्रा येथील किल्ल्याला भेट देतानाही पर्यटक शिवाजी महाराजांबाबत जाणून घेतात. त्यामुळे छत्रपतींची एकनाथ शिंदेंशी तुलना करणे किती अयोग्य आहे, याची जाण पर्यटनमंत्र्यांना पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com