शिवसेनेतील गळती थांबेना : कोकणातील आणखी एक आमदार पुढील काही तासांत शिंदे गटात!

Shivsena|Eknath Shinde : मंत्री उदय सामंत यांनी आजच ठाकरे गटातील आमदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा केला होता
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यानंतर लगेच शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनाही शिंदेंनी आपल्या गटात सामिल करत त्यांनी शिवसेनेला पुन्हा झटका दिला होता. यामुळे ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर मोठा झटका बसला होता. आता आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत शिंदे गट आहे.

दरम्यान आता कोकणातील एका शिवसेना आमदाराने भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जवळच्या व्यक्तीसोबत बैठक केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे यांच्या गटातील आणखी एक नेता ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चिन्हे विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान दिसून आली. हा आमदार आजच शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोकणातील एक-दोन आमदारच हे ठाकरेंसोबत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
भुजबळसाहेब, आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान : फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटातील कोकणातील हा आमदार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी फडणवीसांच्या एका जवळच्या व्यक्तीसोबत बैठक केल्याची माहिती मिळत असून ही भेट नरिमन पॉईंट येथे झाल्याते बोलले जात आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आजच ठाकरे गटातील आमदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा केला होता त्यांच्या या दाव्यानंतर झालेल्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आहे.

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News
अजितदादाचं सूचक विधान ; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल..

दरम्यान, आधीच शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदार आणि अन्य पदाधिकारी फोडल्याने शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. यामधून उद्धव ठाकरे सावरत नाही तोच शिंदे त्यांना पुन्हा झटके देत आहेत. शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्हाबाबातचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र शिंदे अद्यापही थांबण्याचे नाव घेतांना दिसत नसून ठाकरेंकडे असलेल्या १५ आमदारांपैकीही काही आमदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.

यामध्ये या बैठकीची माहिती पुढे आल्याने पुन्हा कुठला आमदार शिंदे आपल्या गळाला लावतात याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान गुवाहाटीवरून बंडखोर आमदार आल्यावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेले शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदेंच्या बाजूने उघड मतदान केलं होतं. यामुळे काहीही होऊ शकते, अशी चर्चा आहे. आता कुठल्या आमदारासोबत ही बैठक झाली आणि तो कोण आमदार आहे यावर जोरदार चर्चा रंगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com