नवनीत राणा अडचणीत! पोलिसांवर खोटे आरोप करणं पडणार महागात
navneet ranasarkarnama

नवनीत राणा अडचणीत! पोलिसांवर खोटे आरोप करणं पडणार महागात

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृह खात्याच्या अहवाल लोकसभा सचिवांना पाठवण्यात येणार आहे. नवनीत राणा यांच्यावर पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणा यांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

'मातोश्री' विरोधात पंगा घेणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत या संदर्भातील अहवाल २४ तासात सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवांनी दिले आहोत. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी राणा यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता.

navneet rana
आव्हाडांना मोठा दिलासा! सीबीआयकडे तपास देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.

navneet rana
'मुंबई पोलीसांचे मनोबल खच्चीकरणाचा राणांचा डाव!'

मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप राणा यांनी केला होता. त्याची लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यातून त्यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन होता. मात्र, तो प्लॅन मुंबई पोलिस आयुक्तांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे फेल झाला असल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचाही हेतू होता. मात्र, तक्रार नोंदवनारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख आहे. मात्र, त्यांना मध्य रात्री सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते. पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे आता राणाच अडचणीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.