शिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का...

Mahavikas Aghadi : हा निर्णय म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray NewsSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडलीच मात्र, सत्तेवर असलेलं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारही कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या आणि आपल्यासोबत आलेल्या आमदारांच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं. यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावाला आहे. (Eknath Shinde News, Uddhav Thackeray News)

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
पालिका आयुक्तांचा सर्वपक्षीय नेत्यांना दणका!, 'त्या' पाट्या तीन दिवसात हटवा...

दरम्यान आता शिंदे सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला असून राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्या आणि कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द केल्या आहेत. या निर्णयानुसार महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या पुणे जिल्ह्यातील डीपीसीवरील १८ सदस्यांचे पद रद्द झाले आहे. हा निर्णय म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News
पंकजा मुंडेंच्या विधानावर धनुभाऊ म्हणाले, पक्षाच्या सर्वोत्तम नेत्यांबद्दल त्या असं बोलत...

राज्यात सत्तांतर झाले असून आता शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. यामुळे डीपीडीसीवरील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांची संख़्या चार, तर विशेष निमंत्रित सदस्यांची संख़्या १४ इतकी होती. राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्‍त्या करण्यात येत असतात. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या आणखी एका निर्णयाला धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in