Nana Patole : अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणा फक्त कागदावरच, शेतकऱ्यांना लाभ किती? पटोलेंचा घणाघात

Devendra Fadnavis : ''फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा..''
Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Kasba By-Election : Nana Patole : Devendra FadnavisSarkarnama

राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, सरकारच्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ आहे, फक्त मोठमोठ्या आकड्यांची घोषणा केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली.

नाना पटोले म्हणाले, ''आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभावाबाबत काहीच नाही. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देखील दिलेली नाही. जुन्या पेन्शनबाबतही अर्थसंकल्पामध्ये काहीही नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प अर्थहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे'', असं ते म्हणाले.

Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Sangli News : जयंत पाटील पुन्हा देणार काँग्रेसला धक्का : माजी सभापतींसह अनेक नेते बांधणार हातात घड्याळ!

''फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे. या अर्थसंकल्पातून समाजातील कोणत्याही घटकाला काहीच मिळालेले नाही. अर्थसंकल्पाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांना वंदन करुन केली.

मात्र, तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर काही कारवाई केली नाही. मुंबईच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण या घोषणा फक्त आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या आहे'', अशी टीकाही त्यांनी केली.

Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal; निवडणुकांसाठी जुमलेबाजी केलेला अर्थसंकल्प

''अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत जाहीर केलेल्या घोषणा या फक्त कागदावर राहणाऱ्या आहेत. यामधून शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल, यात शंका आहे.

पीकविमा हप्ता सरकारने भरला किंवा शेतकऱ्याने भरला काय, पण शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाईपोटी काय मिळते? हे पाहणं महत्वाचे आहे.

शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्याची घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्याबाबत घोषणा केली नाही'', असंही पटोले यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com